Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC:च-होलीतील (काळे कॉलनी) येथील पॅराडाईज इंटरनॅशनल स्कूल आणि किड्स पॅराडाईजमध्ये प्रजासत्ताक दिन

PCMC:च-होलीतील (काळे कॉलनी) येथील पॅराडाईज इंटरनॅशनल स्कूल आणि किड्स पॅराडाईजमध्ये प्रजासत्ताक दिन

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:च-होलीतील (काळे कॉलनी) येथील पॅराडाईज इंटरनॅशनल स्कूल आणि किड्स पॅराडाईजमध्ये प्रजासत्ताक दिन शाळेचे अध्यक्ष अनंत काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत व देशभक्तीपर नाट्य सादर करण्यात आले.नवनाथ काळे यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांना देशप्रेम व स्वतःचे अनुभव कथन केले आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर पडल्यावर कोणत्याही प्रकारची आडचण येऊ नये अशा प्रकारचा  सर्वागीण विकास त्यांच्या मध्ये घडवतो.


संस्थेचे अध्यक्ष अनंत काळे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शाळेत साजरा होणाऱ्या जयंती पुण्यतिथी यातून आम्ही मुलांच्या अंगात देशभक्ती रुजवित आहोत.मुलांच्या सुप्त गुणांना वाव देणे,हेच आमच्या शाळेचे मुख्य उद्देश आहे त्यांनी आपल्या भाषणातून मत व्यक्त केले .
अँड.सचिन काळे यांनी सुद्धा आपल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेले देशभक्तीपर गीत व देशभक्तीपर नाट्य याद्वारे आम्ही विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रुजविण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या शाळेचे विद्यार्थी राज्यस्तरीय क्रिडा विभागात नेहमी पुढे आसतात यापुढे ही मुलांच्या सर्वागीण विकासासाठी आम्ही मदत करू त्यांनी मुलांचे भरभरून कौतुक केले.


कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या स्वाती नवनाथ काळे (किड्स पॅराडाईज स्कूल मुख्याध्यापिका) यांनी सुद्धा शाळेत राबविलेले उपक्रम त्यातून मुलांचा होणारा सर्वांगीण विकास, मुलांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुदृढ राहण्यासाठी केलेले शिबिराचे, सांस्कृतिक कार्यक्रम, यामध्ये असलेला मुलांचा सहभाग याविषयी त्यांनी माहिती दिली.


गुणवंत कामगार अण्णा जोगदंड यांनी सांगितले की,शाळा नेहमीच मुलांच्या भविष्यात विचार करून त्याप्रमाणे त्यांना घडवते व वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर आणुन त्यांना मार्गदर्शन देत असते.
यावेळी अध्यक्ष अँड अनंत काळे,संचालक अँड सचिन काळे,संचालक नवनाथ काळे, गुणवंत कामगार अण्णा जोगदंड, उपस्थित होते.यावेळी मुख्याध्यापिका सौ. प्रज्ञा सचिन काळे ,किड पँराडाईस इंटरनँशनल स्कूल, स्वाती काळे, मुख्याध्यापिका  किड पँराडाईस स्कूल. उपस्थित होत्या.
मुख्याध्यापिका प्रज्ञा काळे व स्वाती काळे यांनी असलेल्या प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले.


शिक्षिका वैशाली येडे व जिजाबाई कल्याणकर,सुवर्णा पवार,क्रिडा शिक्षक संदेश साकोरे,प्रशांत हराळ,प्रणव  सकुंडे,अभिषेक हजारंगे,यांनी कार्यक्रम यशस्वी पाडण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली.
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षाली पुणेकर  व पुजा बनकर विद्यार्थीनीने केले,सांगता राष्ट्रगानाने करण्यात आली.

संबंधित लेख

लोकप्रिय