Friday, May 17, 2024
Homeजिल्हाकॉम्रेड राजू देसले यांना बेकायदेशीर अटक करणाऱ्या पोलीस निरिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी

कॉम्रेड राजू देसले यांना बेकायदेशीर अटक करणाऱ्या पोलीस निरिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी

नाशिक : कॉम्रेड राजू देसले यांना बेकायदेशीर अटक करणाऱ्या पोलीस निरिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी ईपीएस पेंशनर्स फेडरेशन च्या वतीने सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे, नाशिक निवासी जिल्हाधिकरी राजेन्द्र वाघ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान नाशिक दौऱ्यावर आले असता ई.पी.एस ९५ पेन्शनर नेते आयटक, किसान सभा नेते कॉ.राजू देसले यांना पंचवटी पोलिस निरीक्षक नाशिक यांनी दि. ११ जानेवारी २०२३ रोजी रात्री ११ वाजेपासून पोलिस स्टेशन मध्ये ताब्यात ठेवले. व सकाळी पोलिस कस्टडीत टाकले. पोलीस कस्टडीत असताना ४ वाजे पर्यंत सुटका होईपर्यंत जेवण दिले नाही. अमानवी वागणूक दिली. याचा आम्ही निषेध करतो. 

कामगार पेन्शनर, शेतकरी चळवळीत गेली २५ वर्ष काम करत आहेत. पंतप्रधान दौऱ्यात फक्त कॉ. राजू देसले यांना पोलीस कस्टडीत बसवले आहे. याची चौकशी करून पंचवटी पोलिस निरिक्षक यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

निवेदन देतेवेळी ईपीएस पेंशनर्स फेडरेशन चे अध्यक्ष रमेश सुर्यवंशी, उपाध्यक्ष नामदेव बोराडे, सरचिटणीस डी. बी. जोशी, कार्याध्यक्ष चेतन पणेर, एम.एन.हांडगे, शिवाजी घोडे, शुभाष शेळके, रमेश पाध्ये, रमेश खापरे उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय