Thursday, November 21, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपक्ष गेला, चिन्ह गेलं, प्रतोदपदही गेलं. पण उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा दिलासा...

पक्ष गेला, चिन्ह गेलं, प्रतोदपदही गेलं. पण उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा दिलासा कारण..?

शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणाच्या निकालाचं वाचन केलं. यावेळी विधानसभा अध्यक्षांनी विधीमंडळ पक्ष ज्यांचा त्यांचाच राजकीय पक्ष असा मोठा निकाल दिला. त्यामुळे खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला.विधानसभा अध्यक्षांनी भरत गोगावले यांची प्रतोद पदी नियुक्ती वैध ठरवली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे सर्व 16 आमदार विधानसभा अध्यक्षांनी पात्र ठरवले आहेत. विधानसभा अध्यक्षांकडून शिंदे गटाला पूर्णपणे दिलासा मिळाला. तर ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के देण्यात आले. पण या निकालात ठाकरे गटाला एक मोठा दिलासा नक्कीच मिळाला. विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाचे देखील सर्व आमदार पात्र ठरवले आहेत. त्यामुळे ठाकरे गटासाठी हा एक महत्त्वाचा दिलासा मानला जातोय.

सर्वोच्च न्यायालय वकील सिद्धार्थ शिंदे यांनी या निकालावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मोठा दावा केला. “पहिल्या गटाचा निकाल आला आहे. उद्धव ठाकरे यांची मागणी फेटाळली आहे. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील”, असं वकील शिंदे यांनी सांगितलं. “राहुल नार्वेकर सर्वोच्च न्यायालयाच्या व्यतिरिक्त निर्णय देऊ शकतात. उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयात यावं लागेल. नार्वेकर यांनी त्यांच्या सदसदविवेक बुद्धीने निर्णय दिला आहे. कोणताच आमदार अपात्र नाही असा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. हा निकाल देताना त्यांनी भरत गोगावले यांचा व्हीप मान्य करावा लागेल. याचा अर्थ जर उद्धव ठाकरे यांचे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले नाहीत तर त्याच्यावर अपत्रतेची तलवार येऊ शकते”, अशी प्रतिक्रिया वकिलांनी दिली.

उद्धव ठाकरे जाणार सुप्रीम कोर्टात


विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलेला निकाल हा पूर्णपणे शिंदे गटाला दिलासा देणारा आहे. त्यामुळे ठाकरे गट आता पुन्हा सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावू शकतं. उद्धव ठाकरे आता पुन्हा सुप्रीम कोर्टात जावून विधानसभा अध्यक्षांच्या निकालाला आव्हान देण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात प्रत्येक सुक्ष्म गोष्ट निदर्शनास आणून दिली जात आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच दोन दिवसांपूर्वी भेट घडून आली होती. याबाबतही ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात कागदोपत्री माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळातही महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. पण सध्यातरी एकनाथ शिंदे यांच्याकडेच पक्ष आला आहे. तसेच भरत गोगावले यांना प्रतोद म्हणून मान्यता मिळाली आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय