गडचिरोली : संप काळात सरकारने केलेल्या घोषणा नुसार गटप्रवर्तक महिलांना दरमहा दहा हजार रुपये मानधन वाढ, दरमहा आरोग्यवर्धिनीचे पंधराशे रुपये, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सर्व हक्क व दिवाळी बोनस. तसेच आशा महिलांना दरमहा सात हजार रुपये मानधन वाढ देण्याचा जीआर तात्काळ काढा, अंगणवाडी सेविकांना 26 हजार रूपये, मदतनीसला वीस हजार रुपये किमान वेतन, पेन्शन, ग्राजूयटी लागू करा.शालेय पोषण आहार कर्मचाऱयांना किमान वेतन श्रेणी मिळे पर्यंत 15 हजार रुपये मानधन लागू करा. शिक्षण मंत्र्यांनी केलेल्या घोषणे नुसार मासिक 1500 रूपये मानधन वाढीचा जीआर काढा या प्रमुख मागणीसाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गडचिरोली येथे 9 जानेवारी 2024 रोजी प्रशासनाच्या वतीने आयोजित महिला सक्षमीकरण मेळावा करिता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा नियोजित दौरा असल्याची माहिती आयटक पदाधिकारी यांना मिळाल्याने त्यांना जाब विचारण्यासाठी गडचिरोली येथील गांधी चौकात आयटक च्या नेतृत्वात योजना कर्मचाऱ्यांचा जवाब दो! आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला होता.
परंतु आंदोलन करण्याच्या 1 दिवसापूर्वीच आयटक चे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे यांना सकाळीच ब्रम्हपुरी वरून तर जिल्ह्याधक्ष कॉ.देवराव चवळे यांना गडचिरोली पोलिसांनी ताब्यात घेऊन नजर कैद करण्यात आले आणि आंदोलन मागे घेण्याकरिता दबाव आणला जात होता. परंतु जोपर्यंत मुख्यमंत्री यांच्या सोबत भेट घडवून आणल्या शिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आयटक पदाधिकाऱ्यांनी घेतल्याने शेवटी पोलिस अधीक्षक यांनी मुख्यमंत्री सोबत भेट करून देणार असल्याचे मान्य केल्याने गांधी चौकातील राजीव गांधी पटांगणात सकाळी 11 वाजता पासून हजारो योजना कर्मचाऱ्यांनी जवाब दो आंदोलनात सरकार विरोधात तीव्र नारेबाजी केली.
शेवटी आयटक चे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे, जिल्हाध्यक्ष देवराव चवळे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ.महेश कोपुलवार, कॉ.सरिता नैताम, कॉ.फर्जणा शेख, कॉ .वनिता कुंठावार, राधा ठाकरे यांच्या शिषटमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन चर्चा केली.
18 डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनात आयटक महामोर्चात ठरल्या नुसार लवकरच मुंबई मंत्रालयात बैठक घेऊन मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.
जवाब दो आंदोलनात आयटक चे कॉ.विनोद झोडगे, जिल्हाध्यक्ष देवराव चवळे कॉ.डॉ. महेश कोपुलवार यांच्यासह अनेक नेत्यांनी मार्गदर्शन करत सरकारचा खरपूस समाचार घेतला. एकीकडे सरकार ने दोन महिन्यापूर्वी संप काळात घोषणा करूनही आशा वर्कर, गटप्रवर्तक, कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढ,दिवाळी बोनस चा जी आर काढायला वेळ नाही तर अंगणवाडी सेविकांचा 36 दिवस झाले राज्यव्यापी संप सुरू आहे. परंतु तोडगा काढायला सरकार जवळ वेळ नाही, केंद्र सरकारने गेल्या अनेक वर्षांपासून शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ केली नाही तेव्हा शापोआ कर्मचाऱ्यांनी मासिक 2500 रूपये मानधनात जगावे कसे? तेव्हा अश्या वेळकाढू कामगार विरोधी सरकारला येत्या 2024 मध्ये सत्तेवरून खाली खेचण्याचा व पुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आयटक नी दिला आहे. आंदोलनात गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो आशा वर्कर, गटप्रवर्तक,अंगणवाडी सेविका मदतनीस, शालेय पोषण आहार कर्मचारी उपस्थित होत्या.