ता- सांगोला
नाझरा : नाझरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोण कोणत्या सोई सुविधा उपलब्ध आहेत. याची माहिती व चौकशी करून त्याची माहिती नागरिकांना , तसेच कोरोनाच्य संदर्भात जन-जागृती करावी यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. धायगुडे यांची भेट घेतली तसेच नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र शनिवारी व रविवारी इतर दिवसा प्रमाणे चालू ठेवावे अशी मागणी करण्यात आली . उपलब्ध औषधच्या साठ्या बाबतीत ही चौकशी करण्यात आली . कोरोना जन जागृती बाबत घ्यावयाची काळजी बाबत डॉ. धायगुडे यांनी मास्क वापरणे , सोशल डिस्टंसिंग , चे पालन करावे , कामावितिरिक्त बाहेर पडू नये , असे आवाहन केले .
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सूर्यकांत आदाटे , औषध निर्माण अधिकारी विनोद माने , पत्रकार अमीर तांबोळी , पत्रकार अमित खंडागळे , प्रशांत पोरे , पिंटू पाटील , विशाल परिहार , भीमराव कांबळे , संतोष हरिहर व इतर मान्यवर उपस्थित होते .