Friday, November 22, 2024
Homeकृषीदूध उत्पादकांचे जांबवडे (मावळ) येथे आंदोलन; दगडाला घातला दुधाचा अभिषेक

दूध उत्पादकांचे जांबवडे (मावळ) येथे आंदोलन; दगडाला घातला दुधाचा अभिषेक

मावळ : – दूध उत्पादक शेतकऱ्यांना लिटरमागे १० रुपये अनुदान द्यावे, भारतात दूध भुकटी, आणि दुग्धजन्य  पदार्थ मुबलक असताना अमेरिकेच्या दबावाखाली केंद्रसरकार आयात करत आहे, ती  आयात थांबवावी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्व प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात, यासाठी संपूर्ण राज्यात अ. भा. किसान सभेच्या वतीने आंदोलनाची हाक देण्यात आली होती.

आज जांबवडे (मावळ) येथे शेतकऱ्यांनी  शंकराच्या मंदिरात नंदीला मोठा रुद्राभिषेक करून लक्ष्यवेधी आंदोलन केले. घोषणा  देऊन केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी निषेध नोंदविला, त्यावेळी किसान सभेचे राजगुरूनगर तालुका अध्यक्ष अमोद गरुड व जिल्ह्याचे सचिव डॉ. अमोल वाघमारे, डी. वाय. एफ. आय. संघटनेचे गणेश दराडे व जनवादी महिला संघटनेच्या, अपर्णा दराडे उपस्थित होते.

त्यावेळी अनिल घोगजे (सरपंच), अंकुश घोजगे (उपसरपंच) भरत घोजगे, बाळासाहेब शिंदे, योगेश  नाटक पाटील, नितीन भांगरे, सागर शिंदे, गणेश टेमगिरे, पांडुरंग घोजगे, दौलत शिंगटे, इतर दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. 

संबंधित लेख

लोकप्रिय