अभाविपच्या 35 गुंडांनी लाठ्याकाठ्यांनी विद्यापीठात केली मारहाण, मुलींना पण जखमी केले.
विद्यार्थी सदस्य नोंदणी करत असताना मारहाण केली, असा माकप पुणे जिल्हा सचिव कॉम्रेड गणेश दराडे यांचा आरोप
पुणे, (दि:01) : पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दोन विद्यार्थी संघटनांमध्ये हाणामारी झाली आहे. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) या दोन विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये दोन्ही बाजूचे काही कार्यकर्ते जखमी झाले आहेत.
स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) या संघटनेने विद्यापीठात संघटनेच्या सदस्यांची नोंदणी सुरू केली. त्यावेळी अभाविप आणि एसएफआय कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू झाला.
एबीव्हीपीने आमच्या सदस्यत्व नोंदणीमध्ये अडथळा आणल्याचा आरोप एसएफआयने केला आहे. मात्र, एसएफआयचे कार्यकर्ते सदस्यांची नोंदणी करत असताना लाठ्या काठ्या घेऊन अभाविपच्या 35 गुंडांनी SFIचे राज्याध्यक्ष सोमनाथ निर्मल यांच्यासह उपस्थित विद्यार्थी, विद्यार्थीनी भोवती कोंडाळे करून रस्त्यावर आडवे पाडून काठ्यांनी मारहाण करण्यात आली, त्यामध्ये SFI चे पदाधिकारी व सदस्य जखमी झाले आहेत, चतुशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
पुणे विद्यापीठातील हाणामारीचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओनुसार एसएफआयच्या एका कार्यकर्त्याला अभाविपच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करताना दिसत आहे. तर, ABVP कार्यकर्त्याला SFI कार्यकर्त्यांकडून काठीने मारहाण करताना दिसत आहे. दरम्यान, दोन्ही बाजूंकडून चतुशृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सकाळी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) च्या सदस्य नोंदणीला सुरुवात झाली.अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) गुंडांनी अचानक येऊन एसएफआयच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप संघटनेचे राज्य सचिव रोहिदास जाधव यांनी केला आहे.
या हल्ल्यात एसएफआयचे प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय समिती सदस्य सोमनाथ निर्मळ, शहर सचिव अभिषेक शिंदे, गणेश जानकर ई कार्यकर्ते जखमी झाले आहेत. इतर कार्यकर्त्यांनाही मारहाण करण्यात आली आहे. अभाविपचे गुंड नेहमीच अशी हिंसक कृत्ये करत असतात त्यांनी आपल्या गुंड संस्कृतीची पुनरावृत्ती केली आहे. SFI चा सदस्य नोंदणी कार्यक्रम शांततेत चालू असताना कोणतेही उघड कारण नसताना हा हल्ला करण्यात आला. रोहिदास जाधव म्हणाले की, एसएफआयच्या कार्यकर्त्यांना अचानक मारहाण करण्यात आली आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पुणे जिल्हा सचिव यांना ही घटना कळताच त्यांनी तातडीने लक्ष घालून घटनेची माहिती घेतली. या घटनेचा निषेध करताना कॉम्रेड गणेश दराडे म्हणाले की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पूर्व परवानगी घेऊन सदस्य नोंदणी विद्यार्थी करत होते,मात्र विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांनी मारहाण सुरू असताना बघ्याची भूमिका घेतली,अभाविप मोठ्या गटाचे विद्यार्थी मारहाण करून निघून गेले,अभाविपची विद्यापीठात गुंडगिरी करत असते,गणेश दराडे यांनी या घटनेचा निषेध केला आहे.
प्रत्यक्षात मात्र या video मध्ये आपण पाहू शकता की, ज्या apvp च्या कार्यकर्त्याला मार लागल्याचा दावा abvp कडून केला जात आहे. तो कार्यकर्ता हातात काठी घेऊन SFI च्या गणेश जानकर, सोमनाथ निर्मळ यांना काठीने मारहाण करत आहे. आपण जर video pause करून बघितला तर आपल्या लक्षात येईल की हातात काठी घेतलेल्या या abvp च्या कार्यकर्त्याला कुठलीही जखम दिसून येत नाही, म्हणजेच त्याच्या कपाळाला जखम झाल्याचा जो फोटो टाकण्यात आलेला आहे ती जखम नंतर त्याने स्वतःहून करून घेतली असावी किंवा त्याचीच काठी झटापटीत त्याच्याच स्वतःच्या कपाळावर लागली असावी.
SFI चे राज्य अध्यक्ष सोमनाथ निर्मळ (निळा शर्ट) यांना छातीला, बरगड्यांना मोठा मार बसला असून त्यांच्यसह इतर चार कार्यकर्त्यांवर ( एका मुलीचाही समावेश आहे ) ससून रुग्णालयात विविध तपासण्या व उपचार करण्याची प्रक्रिया अजुन सुरू आहे. या video मध्ये ज्याला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी अनेक ABVP चे कार्यकर्ते मारहाण करत आहेत तो गणेश जानकर या SFI च्या कार्यकर्त्याला देखील जोराचा मार लागला आहे.
शांततेत सभासद नोंदणी व विद्यार्थ्यांमध्ये विविध शैक्षणिक मुद्यांवर जनजागृति करण्याची SFI ची मोहिम, सर्वांसाठी चांगल्या शिक्षण व्यवस्थेसाठीचा, दलीत आदिवासी, समाजातील गरीब, वंचित घटकांच्या शिक्षणासाठी चा संघर्ष ABVP चोराच्या उलट्या बोंबानी वा कुठल्याही भ्याड हल्यांनी विचलित न होता अविरत SFI आपले संघटनात्मक कार्य सुरू ठेवणार आहे, असे चालू राहील. SFI चे राज्य सचिव रोहिदास जाधव यांनी सांगितले.