Thursday, December 5, 2024
Homeग्रामीणकिसान सभेच्या वतीने मंचर प्रांत कार्यालयासमोर निदर्शने

किसान सभेच्या वतीने मंचर प्रांत कार्यालयासमोर निदर्शने

आंबेगाव (पुणे) : देशव्यापी राष्ट्रीय संपाला पाठींबा देत अखिल भारतीय किसान सभा पुणे जिल्हा समितीच्या वतीने मंचर येथील प्रांत कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

केंद्रातील भाजप सरकारने पाशवी बहुमताच्या जोरावर शेतकरी, कामगार व विद्यार्थी विरोधी विधेयके मंजूर केलेली आहेत. ही सर्व शेतकरी, कामगार व विद्यार्थी विरोधी विधेयके रद्द करावी, ही प्रमुख मागणी घेत ही निदर्शने करण्यात आली, तसेच मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

आंदोलनाच्या मागण्या पुढीलप्रमाणे :

● केंद्र सरकारने पारित केलेले तीन शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यात यावेत.

● चक्रीवादळामुळे झालेली घर पड व बाळहिरडा नुकसान भरपाई त्वरित मिळावी.

● अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई तत्काळ मिळावी.

● इको सेन्सिटिव्ह झोन रद्द करून पेसा व वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी.

● आंबेगाव तालुक्यातील अद्यापही मूळ रस्त्यांपासून ज्या वाड्यावस्त्यांना डांबरीकरण रस्त्याने जोडले नाही, अश्या रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे प्राधान्याने करण्यात यावी.

यावेळी अखिल भारतीय किसान सभा पुणे जिल्हा समितीचे अध्यक्ष कॉ. नाथा शिंगाडे, कॉ.राजेंद्र घोडे, कॉ.अशोक पेकारी, अशोक जोशी, देविका भोकटे, सुनील पेकारी, सुभाष भोकटे, सुरेश भवारी, दत्ता गिरंगे, शेतकरी संघटनेचे प्रभाकर बांगर, एसएफआय विद्यार्थी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष अविनाश गवारी, आंबेगाव तालुका उपाध्यक्ष तृप्ती दुरगुडे, सचिव समीर गारे, दिपक वाळकोळी, मोहन बांबळे, नेहा शेंगाळे हे उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय