Thursday, December 5, 2024
Homeग्रामीणरामटेक येथे आशा व अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

रामटेक येथे आशा व अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

रामटेक : आशा व आशा व गटपर्वतक कर्मचारी युनियन (सिटू), अखिल भारतीय किसान सभा व अंगणवाडी कर्मचारी संघटना (आयटक) च्या वतीने रामटेक तहसिल कार्यालयासमोर संविधान दिनी संयुक्त धरणे आंदोलन करण्यात आले. 

26 नोव्हेंबर संविधान दिनी देशातील शेतकरी व कामगार संघटनांनी देशव्यापी बंद पुकारला आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोठया संख्येने आशा, अंगणवाडी व शेतकरी सामील होते. 

आशा व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, किमान वेतन द्या, कामगार कायद्यातील बदल रद्द करा, नवीन शेतकरी कायदे रद्द करा, मनरेगा मध्ये 200 दिवसाच काम द्या, महागाई वर आळा घाला, सरकारी क्षेत्राचे खाजगीकरण बंद करा, आयकर न भरणाऱ्या सर्व जनतेला दरमहा 7500 रुपये आर्थिक मदत करा, रोजगार निर्मिती करा, या मागण्या आंदोलनात करण्यात आल्या.

आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे कॉ. राजू हटवार, आयटकचे ऍड. आनंद गजभिये, सिटुचे कॉ. कल्पना हटवार यांनी केले. आंदोलनात नीता भांडारकर, वर्षा वानखेडे, भीमराव गोंडाने, पुष्पां ठाकरे, छाया शेंडे, मंदा चौधरी, विजय कश्यप आदीसह मोठ्या संख्येने अंगणवाडी व आशा कर्मचारी सहभागी झाले होते.

संबंधित लेख

लोकप्रिय