Monday, December 23, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडमोदी सरकारने उज्ज्वला योजनेतून महिलांकडून करोडोंची रक्कम लुटली – आमदार रवींद्र धंगेकर

मोदी सरकारने उज्ज्वला योजनेतून महिलांकडून करोडोंची रक्कम लुटली – आमदार रवींद्र धंगेकर

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत २०० रुपयाची कपात केली आहे. ही कपात २०२४ ची लोकसभा निवडणूक तसेच राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगना व मिझोराम या ५ राज्यातील विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून केली आहे. केवळ सत्तेसाठी जनतेला प्रलोभन दाखवण्याचा हा केविलवाना प्रयत्न या मोदी सरकारने केलेला आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रलोभने आणि खोटी आश्वासने देऊन नागरिकांना आता मोदी सरकार फसवू शकत नाही. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार राहुल गांधी यांनी एक वर्षापूर्वी काढलेल्या भारत जोडो यात्रा मध्ये काँग्रेस पक्षाने नागरिकांशी संवाद साधून भ्रष्ट आणि पोकळ आश्वासने देणाऱ्या केंद्र सरकारचे पितळ उघडे पाडले आहे. त्यामुळे आगामी सर्व निवडणुकांमध्ये मतदार राजा भाजपला घरी बसवल्या शिवाय राहणार नाही असे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले. Modi government looted crores of money from women through Ujjwala scheme – MLA Ravindra Dhangekar

पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने जनसंवाद यात्रा दि. ०४ सप्टेंबर २०२३ पासून चिंचवडगाव येथून सुरू केली आहे. सर्वसामान्य नागरिकांचा या यात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहता येणाऱ्या काळामध्ये केंद्र आणि राज्यामध्ये सत्ता परिवर्तन होईल असा विश्वास पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी व्यक्त केला. 

गुरुवारी पिंपरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक ते नेहरूनगर येथील पंडित जवाहरलाल नेहरू पुतळा पर्यंत शहर काँग्रेसच्या वतीने भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्ती निमित्त पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेच्या समोर प्रसंगी डॉ. कैलास कदम बोलत होते.

यावेळी सेवादल अध्यक्ष विरेंद्र गायकवाड, माजी नगरसेवक बाबू नायर, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, वरिष्ठ उपाध्यक्ष भरत वाल्हेकर, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, डॉक्टर सेल अध्यक्षा मनीषा गरुड, ग्राहक सेल अध्यक्ष झेविअर अंथोनी, सुनीता जाधव, सुवर्णा कदम, शितल सिकंदर, गंगा नाईक, बबिता ससाणे, सुनिता मिसळ, सविता भावके, मंगल विटकर, सुखमल शिंदे, रेखा साळवे, लता साळवे, बाबा बनसोडे, मिलिंद फडतरे, हरीश डोळस, सतीश भोसले, उमेश बनसोडे, गौतम ओव्हाळ, मिलिंद बनसोडे, सचिन कदम, शांताराम कदम, गणेश गोरिवले, अमजत शेख, बजरंग वाघमारे, नवनाथ वडमारे, अतुल दाभोलकर, निलेश मोरे, आदिसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी डॉ. कैलास कदम यांनी सांगितले की, खोट्या, फसव्या, सर्वसामान्यांना छळणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, महिलांचे घरचे बजेट ढासळवणाऱ्या, सर्वत्र महागाईचे सावट निर्माण केलेल्या मोदी सरकारचे कायमस्वरूपी अस्तित्व संपुष्टात येऊन जनता सत्ता परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही.

संबंधित लेख

लोकप्रिय