जालना : जालना जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरू आहे. अत्यंत शांततेने सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लावण्याचे काम येथील प्रशासन करत आहे. त्याचाच परिणाम काल अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलन आरक्षणाच्या प्रमुख मागणीला धरून लोकशाही मार्गाने व शांततेने आंदोलन करत होते. त्या आंदोलनात महिला, पुरुष, वयोवृध्द यांचा समावेश होता.त्यावेळी हुकूमशाही सरकारच्या पोलीस प्रशासनाने लाठीहल्ला केला, त्यात अनेक महिला,पुरुष जखमी झाले या घटनेचा भारतीय ट्रेड युनियन केंद्र (सिटू) तीव्र निषेध करते, असे सिटूचे राज्य कौन्सिल सदस्य अण्णा सावंत, जिल्हा सेक्रेटरी ॲड.अनिल मिसाळ म्हणाले. Public protest against lathis on Maratha protesters – CITU
उच्च वर्णीयांनी आरक्षणाची मागणी केली नसताना सुद्धा भाजप सरकारने संसदेत कायदा करून त्यांना आर्थिक निकषावर 10 टक्के आरक्षण दिले आहे. त्याच पद्धतीने संसदेत कायदा करून मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य आहे. परंतु भाजप सरकारची इच्छाशक्ती नाही. यावरून भाजप सरकार कोणाच्या हितासाठी काम करीत आहे हे स्पष्ट होते. परंतु हे प्रकरण 2024 च्या निवडणुकीत भाजपला महाग पडेल याचा विचार त्यांनी करावा.
या आंदोलकांच्या मागण्याचा सरकार ने त्वरित सकारात्मक विचार करावा.मराठा समुदायातील तरुणाचा रोजगाराचा प्रश्न,शिक्षण प्रश्नांनाचा सरकारने गांभीर्याने विचार केला पाहिजे अशी मागणी भारतीय ट्रेड युनियन केंद्र च्या वतीने करण्यात आले आहे.