गोहत्येच्या निषेधार्थ मूक मोर्चा शांततेत
आळंदी / अर्जुन मेदनकर : कडूस येथे गोहत्या झाल्याचे निषधार्थ आळंदीत मूक मोर्चा शांततेत आयोजन करण्यात आले होते. आळंदीत नागरिक, व्यापारी, व्यावसायिक आस्थापना, वारकरी, भाविक,नागरिक यांना स्वयंस्फूर्तीने मूक मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन समस्त आळंदीकर ग्रामस्थानी केले होते. दरम्यान आळंदीत अत्यावश्यक सेवा वगळता व्यापारी, सर्व व्यावसायिक आस्थापना यांनी आपापली दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवत गोरक्षण कार्याचे जनजागृतीसाठी आळंदीत कडकडीत बंद पाळण्यात आला. यास आळंदी शहरातून मोठा प्रतिसाद मिळाला.
कडूस येथे झालेल्या गोहत्येच्या निषधार्थ आळंदीत स्वयंस्फूर्तीने मूक मोर्चा आणि स्वयंस्फूर्तीने व्यापारी, यांनी आळंदी शहर कडकडीत बंद ठेवत गोहत्येच्या घटनेचा निषेध केला. यात आळंदीकर ग्रामस्थ, सर्व पक्षीय पदाधिकारी, विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, वारकरी, भाविक यांनी सहभागी होत तीव्र निषेध केला. मोर्चा हा गोपाळपुरा तील श्री नरसिव्ह सरस्वती स्वामी महाराज मठ येथे गोपुजन करून सुरू झाला. मुक मोर्चा स्वामी महाराज मठ येथून चाकण चौक आळंदी येथे गो पूजन करीत सुरु झाला. श्री नरसिव्ह सरस्वती स्वामी महाराज मठ मार्गे , चाकण चौक, नगर प्रदक्षिणा मार्गे श्री भैरवनाथ चौक, श्री हजेरी मारुती मंदिर चौक, आळंदी पोलीस स्टेशन मार्गे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे, भायखळा धर्मशाळा मार्गे चावडी चौक येथून श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर महाद्वार चौक येथे समारोपास आला. येथे गोरक्षा शपथ आणि मान्यवरांचे मार्गदर्शन झाले.
मूक मोर्चात समारोपात पिंपरी चिंचेवाड पोलीस आयुक्तालय अंतर्गत सहाय्यक पोलीस आयुक्त चाकण विभाग राजेंद्रसिंह गौर, आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी मोर्चेकरी यांचे निवेदन स्वीकारले. गोरक्षा शपथ, पसायदान गायनाने मुक मोर्चा ची सांगता महाद्वारात शांततेत झाली. मूक मोर्चा शांततेत पार पडला. यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त चाकण विभाग राजेंद्रसिंह गौर, आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, आळंदी दिघी वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे, समस्त आळंदीकर ग्रामस्थ, सेवाभावी संस्था पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. आळंदी पोलीस, दिघी वाहतूक विभाग पोलिस प्रशासनाने विशेष सहकार्य केल्या बद्दल सर्व पोलिस अधिकारी, कर्मचारी यांचेसह मूक मोर्चात सहभागी आणि बंद मध्ये आस्थापना बंद ठेवून केल्याबद्दल आभार समस्त आळंदी ग्रामस्थ यांनी मानले.
लोणावळा व्हिडिओ : भुशी डॅम ओव्हरफ्लो – चला पर्यटन करू
कोट्यावधी रुपये खर्च करूनही पवना इंद्रायणीला जलपर्णीचा विळखा
महाराष्ट्र : वैफल्यग्रस्त मोदी सरकारने केली लोकशाहीची निर्घृण हत्या