मुरबाड : कल्याण मुरबाड रेल्वे प्रकल्पामध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांचा व म्हाडा प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचा विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभा मुरबाड तालुका समिती यांच्या वतीने प्रांत कार्यालयावर शुक्रवारी धडक मोर्चा काढण्यात आला.
मुरबाड तालुक्यातील मौजे देवगाव मधील म्हाडाने संपादित केलेली जमीन मूळ जमीन धारकांच्या नावावर करा यासह इतर मागण्यासाठी अखिल भारतीय किसान सभा जिल्हा सहसचिव कॉ. डॉ. कविता वरे व मुरबाड तालुका अध्यक्ष कॉ. लक्ष्मण भांडे यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. या मोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेचे राज्य कोषाध्यक्ष कॉ. संजय ठाकूर व राज्याचे नेते कॉ. रामचंद्र म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रमुख मागण्या
१. मुरबाड तालुक्यातील मौजे देवगाव मधील म्हाडाने संपादित केलेली जमीन मूळ जमीन धारकांच्या नावावर करा.
२. कल्याण – मुरबाड रेल्वे प्रकल्पात बाधीत होणाऱ्या मूळ जमीन मालकांना घोषित झालेल्या मोबदल्याच्या दहा पट मोबदला त्वरित मंजूर करा.
३. कल्याण – मुरबाड रेल्वे प्रकल्पात बाधीत होणाऱ्या कुटुंबांना रेल्वेत घरटी नोकरी त्वरित मिळाली पाहिजे.
४. कल्याण – मुरबाड रेल्वे प्रकल्पाचे संपादन करण्याच्या अगोदर प्रकल्पग्रस्त दाखला देण्यात यावा.
या मोर्चामध्ये तालुका समितीमधील सर्व सदस्य व बाधित गावांमधील प्रमुख शेतकरी उपस्थित होते. तसेच या मोर्चाला समर्थन देण्यासाठी माकपचे दक्षिण ठाणे शहर तालुका समिती सचिव कॉ. पी के लाली, सिटू संघटनेचे मुरबाड तालुका अध्यक्ष कॉ. दिलीप कराळे, DYFI तालुका अध्यक्ष साथी ज्योती तायडे, AIDWA च्या दुहिता जाधव उपस्थित होते.
हे ही वाचा :
मेगा भरती : राज्यात ‘तलाठी’ पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती
महाराष्ट्राला तीन राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार; राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान
“या” कारणामुळे झाला टायटन पाणबुडीच्या स्फोट सर्व प्रवासी मृत्युमुखी
यवतमाळ येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती
बुलढाणा येथे कृषी विभाग अंतर्गत भरती; पदविका, पदवीधरांना नोकरीची संधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत भरती; आजच करा अर्ज