Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडभक्ती शक्तीला निगडी येथे स्वागत, आकुर्डीत मुक्काम, पिंपरीत विसावा

भक्ती शक्तीला निगडी येथे स्वागत, आकुर्डीत मुक्काम, पिंपरीत विसावा

पिंपरी चिंचवड शहरात पालखी सोहोळ्याची जय्यत तयारी

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दि.10
जून-देहू शहरातून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. जेष्ठ वद्य सप्तमी शनिवार दि.10 जूनला पालखी प्रस्थान दुपारी 2 वाजता होणार असून पालखीचा पहिला मुक्काम येथील इनामदार वाड्यात होणार आहे. रविवार 11 जूनला पालखी सकाळी 10.30 वाजता येथील इनामदार वाड्यातून निघून पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीकडे आकुर्डी येथील दुसऱ्या मुक्कामासाठी रवाना होईल. आकुर्डीतील विठ्ठल मंदिर हे वतनवारी पद्धतीने कुटे कुटुंबीयांकडे आले आहे. हे शिवकालीन मंदिर असून, यंदाचा 337 वा पालखी सोहळा आहे. संत तुकाराम महाराज पायी वारी करत त्या वेळी पहिला मुक्काम याठिकाणी करत होते. त्यामुळे पालखीचा मुक्काम परंपरेप्रमाणे याठिकाणी असतो. वारकर्‍यांच्या सेवेसाठी कुटे कुटुंबीयच नाही, तर शहर पसिरातील सर्व नागरिकांचा सहभाग असतो.



11 जून रोजी सायंकाळी पालखीचे निगडीत आगमन होणार आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व मनपा प्रशासनाने पालखी मार्गावर चोख व्यवस्था केली आहे. पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूला 100 मीटर पर्यंत कोणतेही वाहन पार्किंग करता येणार नाही.विसाव्यासाठी पालखी आकुर्डीत असून दि.12 जून रोजी पहाटे महामार्गाने पालखी पुण्याच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, डॉ. ज्ञानदेव जुंधारे, संजय खाबडे, संजय कुलकर्णी, सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी वारकऱ्यांसाठी सुसज्ज आरोग्य सेवा, फिरती रुग्णालये, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय, स्नानगृहे, विश्रांती कक्ष व्यवस्था करण्यात आली आहे.



संत तुकाराम महाराज पालखीसोबत देहू ते पंढरपूरपर्यंत कर्मचार्‍यांसह अग्निशामक वाहन, पिण्याच्या पाण्याचे टँकर दिले जाणार आहेत. यावर्षी दिंडीप्रमुखांचे स्वागत करताना पालिकेच्या वतीने त्यांना कापडी पिशवी, प्रथमोपचार पेटी, रोप तसेच यावर्षीची वारी हरितवारी , निर्मलवारी,प्लास्टिकमुक्त वारी करण्याचा पालिकेचा संकल्प आहे. शहरात विविध संस्था संघटना, पोलीस , मनपा प्रशासन संयुक्तपणे वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्य आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय