Friday, November 22, 2024
Homeग्रामीणजुन्नर तालुक्यामध्ये देखील “तौक्ते चक्रीवादळा”चा मोठा परिणाम ; जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू

जुन्नर तालुक्यामध्ये देखील “तौक्ते चक्रीवादळा”चा मोठा परिणाम ; जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू

जुन्नर : कोरोनाच्या महामारीमुळे राज्य सरकारने एक जून पर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत झालेले असतानाच, “तौक्ते चक्रीवादळा”चा देखील परिणाम जुन्नर तालुक्यामध्ये होताना दिसत आहे.

“तौक्ते चक्रीवादळा” मुळे रात्रीपासून जुन्नर तालुक्यामध्ये वाऱ्याचा वेग वाढला आहे. काही ठिकाणी अधून-मधून पावसाच्या हलक्या सरी येत आहेत तर काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. वातावरणातील बदलामुळे याचा शेतीला मोठा फटका बसणार असून फळबागांचे मोठे नुकसान होण्याचा अंदाज आहे.

तसेच आज दिवसभर जोरदार वारा आणि पावसाच्या हलक्या सरी येण्याची शक्यता असल्याने आज सूर्यनारायणाचे दर्शन दुर्मिळ होण्याची शक्यता आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय