जुन्नर (पुणे) : राज्यातील विविध भागात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील घाटघर, अंजनावळे, जळवंडी, फांगुळगव्हाण या गावांमध्ये मुसळधार पाऊस झाला .
हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला असून अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे लोकांची एकच धांदल उडाली होती. पावसासह जोराचा वाराच्या त्रासही नागरिकांना सहन करावा लागला.
अचानक सुरू झालेल्या पावसाचा जोर इतका होता की ओढे, नद्या ,नाले यांना पूर आला होता. तसेच भात खाचरांना तळ्यचे स्वरूप आले होते. भात खाचरे तुडुंब भरुन वाहत होती.
घाटघर हा घाटमाथ्यावरच भागात आहे. या भागात मुसळधार पाऊस होत असतो. परंतु अचानक पडलेल्या मुसळधार पाऊसचा भात पेरणीवर परिणाम होण्याची शेक्यता नागरिक व्यक्त करत आहेत.
संपादन – शिवाजी लोखंडे