Friday, November 22, 2024
Homeराज्यमोठी बातमी : केंद्र सरकारची पुन्हा नोटबंदी, या नोटा चलनातून बाद होणार

मोठी बातमी : केंद्र सरकारची पुन्हा नोटबंदी, या नोटा चलनातून बाद होणार

नवी दिल्ली : केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला रात्री 8 वाजता संबोधित करताना हा निर्णय जाहीर केला होता. आता पुन्हा केंद्र सरकारने 2000 रूपयाच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, 2000 रुपयांची नोट मागे घेतली जाणार आहे. परंतु नोटांची यापुढे छापाई बंद केली जाणार आहे. 30 सप्टेंबरपर्यंत ही नोट बँकेत बदलून घेता येणार आहे.

दरम्यान, नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 12 नंतर 500 आणि 1000 रुपयांचा नोटा चलनातून बाद झाल्या होत्या. त्यानंतर सरकारने नवीन नोटा चलनात आणल्या होत्या. यात 500 आणि नवीन 2 हजार रुपयांची नोट सुरु केली होती. आता पुन्हा 2000 रुपयांच्या नोटांची यापुढे छापाई बंद केली जाणार आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय