Saturday, May 4, 2024
Homeआरोग्यकोरोनाअकोले : टिटवी येथे कोरोना लसीकरण प्रतिबंधक लसीकरण संपन्न. पहा व्हिडीओ !

अकोले : टिटवी येथे कोरोना लसीकरण प्रतिबंधक लसीकरण संपन्न. पहा व्हिडीओ !

अकोले : आज दि 29 जून 2021 रोजी पेसा ग्रामपंचायत टिटवी ता. अकोले येथे ग्रामपंचायत कार्यलयाच्या आवारात कोरोना प्रतिबंधक लसीकरण संपन्न झाले. यावेळी ४४ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसी घेतली.

हे लसीकरण लाडगाव आरोग्य केंद्र अंतर्गत डॉ. डगले व डॉ. फलके यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. यावेळी आरोग्य सेविक श्रीमती रोहकले, श्रीमती ईदे यांनी लसीकरण केले.

आदिवासी ग्रामीण भागात कोरोना लसीकरणाबद्दल अनेक अफवांमुळे लसीकरणाला प्रतिसाद मिळत नव्हता. परंतु ग्रामपंचायत द्वारा सरपंच कविता भांगरे यांनी वारली चित्रांचँया माध्यमातून सोशल मिडियावर जनजागृती मोहीम राबवली. तसेच आशा सेविका हिराबाई मुंढे, आशा वायळ, पोलीस पाटील प्रकाश मुंढे, ग्रामपंचायत शिपाई विठ्ठल भांगरे तसेच अंगणवाडी कर्मचारी, प्राथमिक शिक्षक यांनी घरोघरी जाऊन लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले.

यावेळी ग्रामसेवक सेवक गुंजाळ, उपसरपंच हिराबाई मुंढे, पोलीस पाटील प्रकाश मुंढे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, आशा सेविका, अंगणवाडी कर्मचारी, जि. प. शाळेचे मुखध्यापक, शिक्षक कर्मचारी व अनेक ग्रामस्थ कोरोनाचे नियम पाळून उपस्थित होते.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय