Thursday, January 16, 2025
Homeराज्यपालघर साधू हत्याकांड प्रकरणी १४ आरोपींना जमीन मंजूर तर १८ आरोपींचे जामीन...

पालघर साधू हत्याकांड प्रकरणी १४ आरोपींना जमीन मंजूर तर १८ आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले

पालघर : डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे साधूंच्या हत्याकांडप्रकरणी अटकेत असलेल्या १४ जणांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. तर अन्य १८ आरोपींचे जामीन अर्ज ठाणे अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० जुलै रोजी होणार आहे.

पालघरमधील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर समजून जमावाने १६ एप्रिल २०२० रोजी कल्पवृक्ष गिरी (७०), सुशीलगिरी महाराज (३५) आणि गाडी चालक निलेश तेलगडे (३०) यांना बेदम मारहाण करीत निर्घृण हत्या केली होती.

या हत्याप्रकरणी आतापर्यंत २०१ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यापैकी ७५ जणांना मुख्य आरोपी करण्यात आले आहे. मंगळवारी जामीन अर्जावर सुनावणी झाली त्यावेळी १४ जणांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर अन्य १८ आरोपींचे जामीन अर्ज नामंजूर केले आहेत. याप्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश आर. एस. गुप्ता यांच्यासमोर झाली. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या ३० जुलै रोजी होणार आहे.

दरम्यान, अटकेतील काही जणांना ठाणे अतिरिक्त सत्र न्यायालयाने १५ हजारांच्या जातमुचलक्यावर आधीच जामीन मंजूर केला होता.

संबंधित लेख

लोकप्रिय