Friday, November 22, 2024
Homeकृषीशेतकऱ्यांसाठी खुशखबर : पुढील चार दिवस मुसळधार पाऊस, 'या' भागाला अलर्ट

शेतकऱ्यांसाठी खुशखबर : पुढील चार दिवस मुसळधार पाऊस, ‘या’ भागाला अलर्ट

पुणे : गेल्या सात – आठ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार बरसायला सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून विदर्भात जोरदार पाऊस पडत आहे. तर काल रात्रीपासून मुंबईसह कोकणात पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर पहायला मिळणार आहे.

कोकणाला ऑरेंज तर पुण्याला यलो अलर्ट 

हवामान खात्याने 8 ते 12 जुलै दरम्यान संपूर्ण राज्यभरात पाऊस बरसणार असल्याचं म्हटलं आहे. यासोबतच दक्षिण कोकणाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. शनिवार 10 जुलै रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर 12 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

 

 ■ जिल्हानिहाय अलर्ट पुढीलप्रमाणे : 

● 10 जुलै –  रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाला ऑरेंज अलर्ट रायगड, नाशिक, अहमदनगर, जळगाव, विदर्भातील काही जिल्हे आणि पुण्याला यलो अलर्ट 

● 11 जुलै – रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट रायगड, पुणे, सातारा, ठाण्याला यलो अलर्ट 

● 12 जुलै – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि पुण्याला ऑरेंज अलर्ट

संबंधित लेख

लोकप्रिय