Tuesday, January 21, 2025

कोरोना नंतर नवे संकट, ‘या’ विषाणूचे १३ रुग्ण सापडल्यानं खळबळ

थिरुअनंतपुरम (केरळ) : देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. अशा स्थितीत आता झिका विषाणूनं एंट्री घेतली आहे. केरळमध्ये आतापर्यंत १३ जणांना झिकाची लागण झाली आहे। त्यात एका गर्भवतीचा समावेश समजते.

तिरुअनंतपुरमधून घेण्यात आलेल्या रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुण्यातल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजीमध्ये पाठवण्यात आले आहेत.

■ झिकाची लक्षणे पुढीलप्रमाणे : 

तिरुअनंतपुरममधल्या एका खासगी रुग्णालयात २८ जूनला एका २४ वर्षीय गर्भवतीला दाखल करण्यात आलं. या महिलेला ताप, डोकेदुखी, शरीरावर लाल चट्टे अशा स्वरुपाचा त्रास होत होता. झिकाची लक्षणं असल्यानं पुण्यातील प्रयोगशाळेत नमुने तपासण्यात आले. झिकाची लागण झालेल्या महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली .

या विषाणूची लक्षणं दिसायला ३ ते १४ दिवस लागतात. बहुतांश लोकांमध्ये लक्षणंदेखील दिसत नाहीत. काही लोकांना ताप, शरीरावर चट्टे, डोकेदुखी, मांसपेशी आणि सांधेदुखीची समस्या जाणवते. 

पहिल्यांदा युगांडातील माकडांमध्ये सापडला होता

झिका जागतिक आरोग्य संघटनेकडे असलेल्या नोंदीनुसार, झिका विषाणू एडीज डास चावल्यानं पसरतो. हे डास संध्याकाळी जास्त सक्रीय असतात . युगांडात पहिल्यांदा १९४७ मध्ये माकडांमध्ये झिका विषाणू सापडला. यानंतर १ ९५२ मध्ये युगांडा आणि टांझानियात माणसांना या विषाणूची लागण झाली. आशिया, आफ्रिका, अमेरिका, पॅसिफिक महासागरातील बेटांवर आतापर्यंत झिकाचे रुग्ण सापडले आहेत.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles