Monday, May 6, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडश्रमिकांची तहान भागावणारी पाणपोईची संस्कृती टिकवली पाहिजे-राजू भुजबळ

श्रमिकांची तहान भागावणारी पाणपोईची संस्कृती टिकवली पाहिजे-राजू भुजबळ

चिखली-शिवसैनिक हरिभाऊ शिंदे यांच्या स्मृती प्रित्यर्थ पाणपोईचे उदघाटन

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि.३०-
चिखली जाधववाडी येथे शिवसेनेच्या वतीने पाणपोई सुरू करण्यात आली.शिवसेना नेते राजु भुजबळ यांनी सांगितले की,जेष्ठ शिवसैनिक हरिभाऊ शिंदे यांच्या स्मरणार्थ आणि रामनवमी निमित्त तहानलेल्यांची तृष्णा भागवण्याचा धर्म आम्ही निभावत आहोत.सध्या भर उन्हाळ्यात पाणी विकत घ्यावे लागत आहे.पाणपोईचे शुद्ध आणि मोफत पाणी इथून जाणाऱ्या येणाऱ्या गोरगरीब मेहनती श्रमिकांची तहान भागवणार आहे.

पाणपोईची संस्कृती टिकवली पाहिजे.असे राजु भुजबळ म्हणाले.
यावेळी रुपालीताई आल्हाट,संतोष तात्या जाधव,नाना आहेर,सीता ताई केंद्रे,माऊली राऊत,वासुदेव जाधव,राहुल गरड,भारत नरवडे,संजय जाधव,श्रीराम गादेकर,अच्युत राव घंटाले,अण्णा चौधरी,गोविंद बंदावने,मामा गायकवाड,रामदास खोबरे,नितीन बोते, मोहन रणदिवे,अनिकेत आहेर,राजू बनकर,अशोक शिंदे,महेश शिंदे,देविदास शिंदे,शंकर घंटे,जमीर शेख,वसंत जाधव,अन्वर शेख,वासुदेव जाधव,हरिहर साहेब,जोगदंड साहेब,प्रवीण मेलवणे आदी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय