Tuesday, May 21, 2024
HomeNewsशिवतेजनगर येथे श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन संपन्न

शिवतेजनगर येथे श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन संपन्न

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: श्री स्वामी समर्थ जेष्ठ नागरिक संघ,शिवतेजनगर,चिंचवडचा ९ वा वर्धापन दिन नुकताच दि.०४/०२/२०२३ शनिवार रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अजित गव्हाणे यांच्या हस्ते स्वामी हस्तलिखित विशेषांकचा प्रकाशन सोहळा पार पडला.माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.सर्व प्रथम संघाचे अध्यक्ष प्रा हरिनारायण शेळके यांनी प्रास्ताविक करून संघाच्या कार्यक्रमाचा आढावा घेतला.

ज्येष्ठ नागरिकांचा असलेला उत्साह द्विगुणित करण्यासाठी नजराणा हास्याचा हा धमाल मनोरंजनाचा कार्यक्रम सुप्रसिद्ध विनोदवीर दिलीप हल्ल्याळ आणि मराठी नाटक,हिंदी सिरियल फेम अभिनेत्री स्मिता ओक यांनी सादर केला.उपस्थित श्रोत्यांना आपल्या विनोदी द्विपात्री प्रयोगाने हसून हसून मंत्रमुग्ध केले.या कार्यक्रमाचे . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका रिकामे यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय