Wednesday, May 22, 2024
HomeNewsकाँग्रेसचे आज एसबीआय, एलआयसी कार्यालयासमोर राज्यव्यापी आंदोलन; अदानींच्या गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी

काँग्रेसचे आज एसबीआय, एलआयसी कार्यालयासमोर राज्यव्यापी आंदोलन; अदानींच्या गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी

स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), एलआयसी व अन्य सरकारी संस्थांचा पैसा नियम डावलून अदानींच्या उद्योग समूहात गुंतवणाऱया नरेंद्र मोदी सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने उद्या राज्यातील सर्व एसबीआय आणि एलआयसी कार्यालयांसमोर आंदोलन केले जाणार आहे.अदानींच्या गैरकारभाराची चौकशी करावी अशी मागणी यावेळी केली जाणार आहे.

या राज्यव्यापी आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, सुनील केदार, नितीन राऊत, अमित देशमुख, नसीम खान, विश्वजीत कदम, चंद्रकांत हंडोरे, आमदार कुणाल पाटील, प्रणिती शिंदे, बसवराज पाटील यांच्यासह काँग्रेसचे सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय