Monday, May 6, 2024
Homeराज्यचंदिगड येथे स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अभ्यास शिबीरास सुरुवात

चंदिगड येथे स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अभ्यास शिबीरास सुरुवात

चंदिगड : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अभ्यास शिबीरास चंदिगड येथे सुरुवात झाली. या शिबिरासाठी महाराष्ट्रातून दहा विद्यार्थी दाखल झाले आहेत.

पहिल्या दिवशी जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय महासचिव मरियम ढवळे यांनी ‘लैंगिक न्याय आणि आपली भूमिका’ या विषयावर तर एसएफआयचे माजी राष्ट्रीय महासचिव डॉ. विक्रमसिंग यांनी ‘एसएफआयचा कार्यक्रम आणि विद्यार्थी आंदोलनाचा इतिहास’ या विषयावर मार्गदर्शन केले. 

हे वाचा ! केंद्र सरकारचा सार्वजनिक कंपन्या विकण्याचा सपाटा, पुन्हा दोन कंपन्या विकणार !

यावेळी एसएफआयचे राष्ट्रीय महासचिव मयुख बिश्वास, राष्ट्रीय सहसचिव दिपसीता धर आणि दिनीत देन्टा, राष्ट्रीय सचिवमंडळ सदस्य नितीश नारायणन, केंद्रीय कमिटी सदस्य व महाराष्ट्र राज्य सचिव रोहिदास जाधव आदीसह उपस्थित होते.

देशभरातील वेगवेगळ्या राज्यातील विद्यार्थी या शिबिरात सहभागी झाले आहेत.

हे पहा ! २०२१ “द रिअल सुपर वूमन अवॉर्ड” च्या राष्ट्रीय पुरस्काराने प्रा. जयश्री दाभाडे यांना केले सन्मानित


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय