Saturday, April 27, 2024
Homeजिल्हाकल्याण : टावरीपाडा येथे राजस्थानी समाजाच्या वतीने महाआरतीचे आयोजन कार्यक्रम संपन्न

कल्याण : टावरीपाडा येथे राजस्थानी समाजाच्या वतीने महाआरतीचे आयोजन कार्यक्रम संपन्न

कल्याण : टावरीपाडा, कल्याण येथे राजस्थानी समाजाच्या वतीने वीर गुरू गोरखनाथ, व वीर गोगापीर याच्या निशान चे श्रावण महिन्यातचे  शेवटचे महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. 

या वेळी निशान आखाडयाचे खलिफा व सेवेकरी गुरूपौर्णिमा पासून ते श्री कृष्ण जन्माष्टमी पर्यंत 40 दिवस सोहळ्यात राहुल  व 40 दिवस उपवासात राहून एक वेळ जेवण करत स्व:ताचे हाताने प्रसाद व जेवण स्वतः च बनवून आलेल्या सर्व भक्तांना प्रसाद वाटप करतात व 40 दिवस पायात चप्पल न घालता   निशान ची भक्तानी त्यांच्या बोलवल्या ठिकाणी भक्ताच्या घरी दर्शना करीता घेवून  जातात. 

हे पहा ! चंदिगड येथे स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अभ्यास शिबीरास सुरुवात

यात निशान छडी चे वैशिष्ट्य म्हणजे भक्तानी 40 दिवसात प्रसाद रूपी जेवढी नारळ  चढवतात. तेवढी नारळ निशान छडीला बांधून  व रोजचे फुलांची चादरी चढवले जातात. सजावटी सामानासह त्यांच्या सह सेवेकरी आपल्या पोटावरून बांधलेल्या पट्ट्यात अडकून नाचवतात. छडीचे वजन कमीतकमी 200 ते 250 किलो पेक्षा जास्त असते. अश्यात छडी निशान घेवून सेवेकरी    नाचवतात. दहीहंडी च्या दिवशी शेवटची महाआरती व महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी प्रहार जनशक्ती रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केंद्र महाराष्ट्र राज्य ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष दिपक चव्हाण  यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. 

हे वाचा ! केंद्र सरकारचा सार्वजनिक कंपन्या विकण्याचा सपाटा, पुन्हा दोन कंपन्या विकणार !

या वेळी आखाडयाचे अध्यक्ष विकास तेजी, संजय कलोसिया, सुरेश कोटीयाना, मोहन टाक, सुनिल कलोसिया, आकाश तेजी, जय चव्हाण, साहील उजैनवाल, प्रकाश तेजी, विशाल अटवाल, पारश गवळी, चेतन तेजी, साहील  चव्हाण, बादशहा टाक, हरीष चव्हाण, रोहन तेजी, संतोष चंडालिया, नितेश चव्हाण, विशाल करोशिया, नितेश घेंगट व सर्व सेवेकरी भक्त उपस्थित होते. या वेळी कार्यक्रमाचे सांगता आखाडयाचे खलिफा संजय कलोशिया यांच्या हस्ते करण्यात आले.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय