पिंपरी चिंचवड : घरकुल वसाहती मधील नागरिक पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागातून आलेले आहेत. त्यांच्या आधार कार्ड वर पुर्वीचा पत्ता असल्याने शासकीय आणि अन्य सेवा मिळवण्यासाठी त्यांना तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या.
आधारकार्ड मोबाईल लिंकिंग साठी येथील नागरिकांना दुरवरील पोस्ट कार्यालयामध्ये जावे लागत होते. येथील बहुतांश नागरिक सूक्ष्म,लघु,मध्यम उद्योगात काम करणारे आहेत. रविवारी औद्योगिक सुट्टी असल्यामुळे शहरातील निवडक आधार मोबाईल लिंकिंग कार्यालयात जाणे शक्य नव्हते.
हेही वाचा ! पुणे : किल्ले शिवनेरीसह जिल्ह्यातील भारतीय पुरातत्व विभागाची स्मारके पर्यटनासाठी खुली
घरकुल मधील लोकांना इतर ठिकाणी न जाता घरकुलला ही सुविधा आणि मोहीम कशी राबवता येईल या साठी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर सरचिटणीस अशोक मगर यांनी विभागीय पोस्ट ऑफिस कार्यालयास आधार लिंकिंगची सेवा घरकुल येथे द्यावी, अशी मागणी केली होती.
दि.14 आणि 16 सप्टेंबर 2021 रोजी चिंचवड पोस्ट ऑफिसचे नदाफ, अमर भोसले, तसेच रूपीनगर पोस्ट ऑफिसचे पोस्टमन किशोर ससाणे, यांनी 165 नागरिकांचे आधारकार्ड मोबाईल लिंकिंग पूर्ण केले. या अभिनव लोकोपयोगी शिबिरामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
हेही पहा ! उत्तर कोरियाची ‘ही’ मिसाईल चाचणी जगाला धक्का देणारी !
घरकुल गोल सर्कल दवाखाना, शेजारी ही मोहीम राबवण्यात आली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघिरे पाटील, फझलभाई शेख, अरूण बोराडे, आल्हाट, माधव पाटील, दादासाहेब खनके मान्यवरांनी सदर शिबिराला भेट दिली. सदर ठिकाणी या कार्यक्रमासाठी विकासराजे केदारी, दशरथ शिंदे, प्रमोद कांबळे,प्रेमा शेट्टी, दत्तात्रय आढाव, दिलीप महाडिक, प्रविण बहिर, प्रदिप शेवाळे, सुनिल मधाळे, पांडूरंग पाटील, अक्षय ओहोळ, सागर हुसळे आणि घरकुलकर मोठ्या संख्येने हजर होते.
जाणून घ्या ! केळी खाण्याचे फायदे व तोटे