Thursday, January 23, 2025

पुणे : किल्ले शिवनेरीसह जिल्ह्यातील भारतीय पुरातत्व विभागाची स्मारके पर्यटनासाठी खुली

जुन्नर : पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्यातील भारतीय पुरातत्व विभागाची स्मारके खुली करण्याचा आदेश दिला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार आज शुक्रवार ता. १७ पासून छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेला किल्ले शिवनेरी शिवभक्तांसाठी खुला करण्यात आला आहे. वनक्षेत्रपाल अजित शिंदे यांनी यास दुजोरा दिला आहे. शिवभक्त व पर्यटकांना पवित्र शिवजन्मभूमीचे दर्शन घेता येणार आहे. 

हेही वाचा ! उत्तर कोरियाची ‘ही’ मिसाईल चाचणी जगाला धक्का देणारी !

आज पहिल्याच दिवशी विविन ठिकाणाहून आलेल्या सुमारे पाचशे पर्यटकांनी शिवनेरीला भेट दिली असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यातील स्मारके खुली करण्याचे निर्देश देण्यात यावेत असे भारतीय पुरातत्व विभागाच्या अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळविले होते त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही पहा ! …तर पेट्रोल ७५ रुपये आणि डिझेल ६८ रुपये लीटर होणार !

कोव्हीड – १९ च्या अनुषंगाने दिलेले आदेश व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याची जबाबदारी पुरातत्व खात्यावर असून या ठिकाणी शारिरीक अंतर बाळगणे, मास्कचा तसेच सॅनिटायझर चा वापर बंधनकारक असल्याचे आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. 

शिवनेरी पर्यटक व शिवभक्तांसाठी खुला झाला असला तरी गडावरील शिवाई मातेचे मंदिर मात्र बंद राहणार आहे. मंदिरे खुली करण्याचा आदेश नसल्याने गडावरील शिवाई मातेचे दर्शन घेता येणार नाही.

हे वाचा ! आदिवासी साहित्यासाठीचा डॉ.गोविंद गारे पुरस्कार पुन्हा सुरू करण्याची मागणी


Related Articles

- Advertisement -

Latest Articles