Wednesday, January 15, 2025
HomeNewsरॅपिडो बाईक सेवा असुरक्षित, बंदी हवीच – काशिनाथ नखाते

रॅपिडो बाईक सेवा असुरक्षित, बंदी हवीच – काशिनाथ नखाते

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : महाराष्ट्रामध्ये विनापरवाना, बेकायदेशीर, रॅपिडोसह इतर मोबाईल नोंदीद्वारे दुचाकी वरून प्रवासी वाहतूक करून असुरक्षित प्रवासी सेवा रिक्षा व्यवसाय मोडकळीस आणेल. प्रवासी व्यवसाय स्वातंत्र्याच्या नावाखाली कंपनीची ॲप बेस्ड सेवा अवैध धंदा करत आहे. देशातील २२ राज्यांमध्ये सेवा देत असून केवळ एग्रीकेटर लायसनची त्यानी मागणी केली आहे. मात्र, पुणे परिवहन विभागाने तसेच महाराष्ट्र राज्य शासनाने याला कुठलीही परवानगी दिलेली नाही. मात्र, बेकायदेशीर रॅपिड दुचाकी वर कारवाई कराल तर न्यायालयात जाण्याचा इशारा कंपनीने काल दिला आहे. हा प्रकार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत असे मत कष्टकरी कामगार नेते काशिनाथ कधी यांनी केले.

त्यामुळे रिक्षा चालकांच्या उदरनिर्वाहावर गंभीर परिणाम झालेला आहे. दुचाकीवरती प्रवासी सुरक्षित नाही,हेल्मेट नाही त्यामुळे अनेक अपघात होऊन मृत्युमुखी पडण्याची शक्यताही आहे. चोरून बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या आणि शासनाला कसल्याही प्रकारचा कर न भरता अशाप्रकारे होणाऱ्या वाहतुकीचा निषेध करत त्वरित बंदी घालण्याची मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कष्टकरी संघर्ष महासंघ, सारथी चालक-मालक महासंघातर्फे करण्यात आली आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय