Saturday, April 20, 2024
HomeNewsबाबा कांबळे यांची रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

बाबा कांबळे यांची रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : पिंपरीत राज्यभरातील रिक्षा चालक-मालक संघटनांच्या प्रतिनिधींची परिषद मोठ्या उत्साहात पार पडली. नांदेड येथील वैजनाथ देशमुख परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते. राज्यभरातून संघटनेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी अध्यक्षपदासह इतर पदांच्या निवडीचा ठराव करण्यात आला असल्याचे वैजनाथ देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.

पिंपरी-चिंचवड मध्ये राज्यभरातील सर्व रिक्षा चालक मालकांची संयुक्‍त कृती समिती स्थापन असून या समितीच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांची एकमताने सर्वांनी निवड करण्यात आली आहे.

तसेच महासचिव पदी कासम मुलाणी, कार्याध्यक्षपदी वैजनाथ देशमुख यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. नरेंद्र गायकवाड (नांदेड), गफारभाई नदाफ (कराड), आनंद तांबे, बापू भावे (पुणे), रामभाऊ पाटील, फिरोज मुल्ला, (सांगली) कासम मुलाणी (मुंबई), आनंद चौरे, रवी तेलरंदे (नागपुर), राहुल कांबळे (कल्याण डोंबिवली), तानाजी मासलकर, बाळू फाळके (सोलापूर), शिवाजी गोरे, आशिष देशपांडे (ठाणे), बल्लूर स्वामी (इचलकरंजी) सानी हुमने,अब्बास भाई (चंद्रपूर) सह राज्यातील रिक्षा चालक मालक प्रतिनिधीं उपस्थित होते. संविधानिक मार्गाने न्यायहक्काची आंदोलने करून रिक्षा व्यवसायिकांचे प्रश्न सोडवणार आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय