Monday, May 6, 2024
Homeराज्यएसएफआयच्या राज्य अध्यक्षपदी सोमनाथ निर्मळ तर सचिवपदी रोहिदास जाधव यांची निवड!

एसएफआयच्या राज्य अध्यक्षपदी सोमनाथ निर्मळ तर सचिवपदी रोहिदास जाधव यांची निवड!

जुन्नर (ता.२०) : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)चे तीन दिवस चाललेले १८ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन रविवारी संपन्न झाले. या अधिवेशनात एसएफआयची नवीन महाराष्ट्र राज्य कमिटी निवडली गेली. त्यात राज्य अध्यक्षपदी सोमनाथ निर्मळ तर सचिवपदी रोहिदास जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली.

या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध विषयांसंदर्भात ठराव मांडून ते पारित करण्यात आले. राज्यभरातील २१४ प्रतिनिधी या अधिवेशनात सहभागी झाले होते. यावेळी ३ वर्षांच्या अहवालावर चर्चा करून शैक्षणिक मागण्यांचे ठराव पारित करण्यात आले.

किल्ले शिवनेरी जुन्नर येथे झालेल्या या राज्य अधिवेशनात नवीन ४१ सदस्यांची राज्य समितीची एकमताने निवड करण्यात आली. यामध्ये सोमनाथ निर्मळ यांची राज्य अध्यक्षपदी तर राज्य सचिवपदी रोहिदास जाधव यांची निवड करण्यात आली. तसेच राज्य उपाध्यक्षपदी भास्कर म्हसे (ठाणे-पालघर), मल्लेशम कारमपुरी (सोलापुर), सत्यजित मस्के (ओंरगाबाद) तर राज्य सहसचिवपदी विलास साबळे (पुणे), लहु खारगे (बीड), रामदास (मुंबई) यांची निवड करण्यात आली. यासोबतच राज्य सचिव मंडळात नवनाथ मोरे (पुणे), विजय लोहबंदे, संतोष जाधव (बीड), पल्लवी बोराडकर (औरंगाबाद), सायली अवघडे (सातारा) यांचा समावेश आहे.

यावेळी कमी पटसंख्येच्या जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करा, नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा, महिलांवरील अत्याचाराविरोधातील लढा तीव्र करा, नोकर भरती त्वरीत करा, धर्मांध शक्तींविरोधातील लढा तीव्र करा, शिक्षणाचे खाजगीकरण रद्द करा आदींसह शैक्षणिक मागण्यांचे १५ ठराव एकमताने पारित करण्यात आले.

यावेळी संबोधित करताना सोमनाथ निर्मळ म्हणाले, सर्वांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि पात्रतेनुसार रोजगार देण्यासाठी लढाई तीव्र करण्याची हाक हे अधिवेशन देत आहे. तसेच शाळा बंदीचे धोरण, आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांच्या फेलोशिपचा प्रश्न, शिष्यवृत्तीचे प्रश्न, महिलांवरील अत्याचार आणि नवीन शैक्षणिक धोरणाविरोधातील संघर्षासाठी तयार राहण्याचे आवाहन केले.

यावेळी राष्ट्रीय महासचिव मयुख बिश्वास, राष्ट्रीय उपाध्यक्ष बालाजी कलेटवाड, राष्ट्रीय सहसचिव दिनित देंटा आदी उपस्थित होते.

कोण आहेत सोमनाथ निर्मळ ?

सोमनाथ निर्मळ हे पुण्यातील जुन्नर तालुक्यातील हातविज येथील आहे. ते सध्या पुणे विद्यापीठात समाजशास्त्र या विषयावर पीएचडी करत आहेत. निर्मळ हे नुकतेच आपल्या संशोधनासाठी नॉर्व येथे जाऊन आलेले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय