Monday, May 6, 2024
HomeNewsराज्यात वाढला थंडीचा कडाका ; आणखी 2 दिवस थंडी कायम

राज्यात वाढला थंडीचा कडाका ; आणखी 2 दिवस थंडी कायम

पुणे : रविवारी राज्यातील बहुतांश शहरांचा पारा तीन ते चार अंशांनी खाली आला. प्रामुख्याने जळगाव (8.5), पुणे (9.7), नाशिक (9.8), औरंगाबाद (9.2) ही शहरे पारा 10 अंशांखाली गेल्याने गारठून गेली.दरम्यान, आगामी दोन दिवसांत थंडीचा जोर कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रविवारी राज्यातील जळगाव, पुणे, नाशिक व औरंगाबाद या चार शहरांचे तापमान दहा अंशांखाली गेल्याने यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली.

दुपारपासूनच गारठा जाणवू लागल्याने नागरिकांनी दुपारपासूनच स्वेटर, कोनटोपी घालून राहणे पसंत केले. सायंकाळीच शेकोट्या पेटलेल्या दिसू लागल्या. प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यासह विदर्भातील काही शहरे रविवारी गारठली होती. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने उत्तर भारतातून गार शीतलहरी सक्रिय झाल्या.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय