Wednesday, May 1, 2024
Homeग्रामीणमाणकेश्वर येथे कृषी विभागाअंतर्गत रब्बी हंगाम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

माणकेश्वर येथे कृषी विभागाअंतर्गत रब्बी हंगाम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

जुन्नर : महाराष्ट्र शासन कृषी विभाग जुन्नर यांच्या माध्यमातून माणकेश्वर येथे रब्बी हंगाम प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

या कार्यशाळेसाठी कृषी विभागाचे मडके मॅडम, भालेकर ए के यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पुढील विषयांवर उत्तम मार्गदर्शन केले. यावेळी हरभरा बीजप्रक्रिया, सरीमध्ये लागवड, कृषी यांत्रिकीकरण, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड, गांडुळ खत प्रकल्प आणि नाडेप प्रकल्पाबरोबरच विविध कृषी विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली.

कृषी विभाग सातत्याने शेती संदर्भात विविध योजना, कार्यक्रम, कार्यशाळा, उपक्रम आणि शेतीचे उत्तम आधुनिक प्रयोग राबवत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना छान माहिती व मार्गदर्शन मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

या कार्यशाळेसाठी तालुका कृषी अधिकारी शिरसाठ एस. के., मंडल कृषी अधिकारी जाधव डी. एस., कृषी अधिकारीरोकडे बी. इ. आणि सर्व कर्मचारी यांचे सातत्याने सहकार्य आणि मार्गदर्शन मिळत आहे. या वेळी माणकेश्वर गावचे पोलीस पाटील रोहिदास कोरडे, जुन्नर तालुका किसान सभा कार्याध्यक्ष कोंडीभाऊ बांबळे, माणकेश्वर गाव किसान सभा अध्यक्ष एकनाथ मुंढे तसेच धर्मा कोरडे, रामचंद्र कोरडे, लक्ष्मण कोरडे, रामदास लांडे, दत्तात्रय लांडे, जाणकू लांडे, रामचंद्र लांडे, यमुना साबळे, काशिनाथ बांबळे, विष्णू कोरडे, बाळू कोरडे, मच्छिंद्र कोरडे, किसन शेळकंदे, वसंत कोरडे, सदाशिव लांडे, एकनाथ मुंढे, शंकर उतळे, धोंडू बांबळे, अमोल बांबळे, किसन उतळे, भीमा बांबळे, श्वेता मुंढे, बाळू चौधरी, सुलबाई दिघे, बबन बांबळे, शांताबाई लांडे, भीमाबाई बांबळे, गणपत कोरडे आदी शेतकरी महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय