Wednesday, May 8, 2024
HomeNewsअनंत अंबानी यांना कोरोनाची लागण?, कालच मुख्यमंत्र्यासह दिग्गजांनी घेतली होती भेट

अनंत अंबानी यांना कोरोनाची लागण?, कालच मुख्यमंत्र्यासह दिग्गजांनी घेतली होती भेट

मुंबई : जगात श्रीमंताच्या यादीत झळकणारे मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी (Anant Ambani Covid Positive) यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. तसेच अनंत अंबानी यांना एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची देखील सांगितले जात आहे. मात्र रिलायन्स समूहाने या वृत्तावर स्पष्टीकरण दिले आहे.

अनंत अंबानी यांना कोरोनाची लागण झाली असून शुक्रवारी प्रकृती खालावल्यानं त्यांना एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. चिंतेची बाब अशी की कालच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच हे मुकेश अंबानी यांच्या घरी गणपती दर्शनासाठी गेले होते. याशिवाय रणवीर सिंग आणि दिपीका पादुकोन हेही त्यांच्या घरी गेल्याची माहिती मिळत आहे. मात्र रिलायन्स समूहाने हे वृत्त फेटाळलं आहे. अनंत अंबानींना कोरोनाची लागण झालेली नसल्याची माहिती या समूहाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात झालेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एजीएममध्ये, रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानींचा नव्या एनर्जी व्यावसायात समावेश करण्याची घोषणा केली होती.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय