जुन्नर : चाइल्ड फंड इंडिया संस्थेमार्फत, जुन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागातील न्यू इंग्लिश स्कुल, निमगिरी या विद्यालयास सायन्स किट वाटप करण्यात आले. या सायन्स किटचा वापर विज्ञान विषयातील प्रयोग करताना होईल. तसेच विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची गोडी निर्माण होण्यास मदत होईल.
यावेळी चाइल्ड फंड इंडिया संस्थेचे कर्मचारी अनंता बो-हाडे, प्रणित नायकोडी, महेश नायकोडी, विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.आर.पवार, शिक्षक डी.बी.मानकर, डी.एस.केंद्रे, जे.एस. गायकर, लिपिक व्ही.एस.भालेराव, शिक्षकेतर कर्मचारी यु.एस.मोरे , आर.बी.वाकचौरे, ए.बी.पटेल आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी.एस.केंद्रे यांनी केले.
जुन्नर : निमगिरी येथील न्यू इंग्लिश स्कूलला सायन्स किटचे वाटप
संबंधित लेख