Friday, November 22, 2024
Homeजिल्हामहागाई, बेरोजगारी, आरोग्य व्यवस्था हे खरे प्रश्न - डॉ.राम पुनियानी

महागाई, बेरोजगारी, आरोग्य व्यवस्था हे खरे प्रश्न – डॉ.राम पुनियानी

नाशिक : महागाई, बेरोजगारी, आरोग्य व्यवस्था हे खरे प्रश्न असून, धर्माचा वाद केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी वापरलेलं हत्यार आहे, असे प्रतिपादन विचारवंत डॉ. राम पुनियानी यांनी केले. सिटूभवन येथे सिटूच्या दोन शिबिराच्या दिवसीय राज्य शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते.

पहिल्या सत्रात ‘धर्मांधता जातीयवाद आणि कामगार एकजूट’ या विषयावर बोलताना डॉ‌. राम पुनियानी यांनी सांगितले. संघ परिवाराकडून ऐतिहासिक तथ्यांची मोडून तोडून मांडणी केली जात आहे. धार्मिक द्वेषाविरोधात कामगार वर्गाने त्यांच्या न्याय आर्थिक व सामाजिक मागण्यांसाठी एकजूट व संघर्ष करून लढले पाहिजे. महागाई, बेरोजगारी, आरोग्य व्यवस्था हे खरे प्रश्न असून, धर्माचा वाद केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी वापरलेलं हत्यार आहे, असेही पुनियानी यांनी सांगितले.

डॉ. विवेक मॉन्टेरो यांनी स्वातंत्र्य चळवळीतील कामगार वर्गाचे योगदान तर अण्णा सावंत यांनी सिटूची घटना व उद्दिष्टे या विषयावर मांडणी केली. यावेळी सिटूचे राज्याध्यक्ष डॉ. डी.एल. कराड, राज्य सरचिटणीस एम.एच.शेख, सईद अहमद, सीताराम ठोंबरे आदींसह शिबिरार्थी उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय