Friday, November 22, 2024
Homeजिल्हापशुवैद्यकीय दवाखाना, लिंगनूर येथे वृक्षारोपण

पशुवैद्यकीय दवाखाना, लिंगनूर येथे वृक्षारोपण

कागल : आज 5 जून, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पशुवैद्यकीय दवाखाना, लिंगनूर येथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.विनोद मगदूम यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण करण्यात आले. 

यावेळी वनविभागाचे शिंदे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद मगदूम, डॉ.प्रवीण चेचर, कॉ. विलास भोसले, तुषार किल्लेदार हे उपस्थित होते.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ अंतर्गत 100 पदांसाठी भरती, 30000 ते 80000 पगाराची नोकरी

लिंगनूर गाव नेहमीच पर्यावरण समतोल राखण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवित असते. यामध्ये गावच्या डोंगरात श्रमदानातून शेकडो समतल चरी (CCT ) खोदून लाखो लिटर पाणी अडवून जिरवले. त्यामुळे येथील आस पासच्या विहरी आणि बोअरवेल ची भूजल पातळी वाढली. 

गावात अनेक सर्पमित्र असल्याने गाव व परिसरातील साप पकडून सुरक्षित ठिकाणी सोडले जातात. गावातील तरुणांनी जंगल ट्रेकिंग माध्यमातून जंगलांचे महत्त्व, जैवविविधता याबद्दल माहिती दिली जाते. विविध किल्ल्यांना – जंगलांना भेट देऊन तेथील प्लास्टिक उचलून स्वच्छ्ता केली जाते. या उपक्रमांतून गावात अनेक पर्यावरण प्रेमी तरुण तयार झाले आहेत.

नवीन भरती : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 140 पदांसाठी भरती, 24000 रूपये पगाराची नोकरी

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या एकूण 1085 जागा, 17 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

दक्षिणी कमांड पुणे येथे लघुलेखक, कुक, सफाईवाला, चौकीदार पदांसाठी भरती, 10 वी व 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी


संबंधित लेख

लोकप्रिय