सोलापूर : चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन शनिवार व रविवार दिनांक 23 व 24 जुलै 2022 रोजी सांगोला जि. सोलापुर येथे होणार आहे. साहित्य संमेलन संस्थापक डॉ. अभिमन्यु टकले आहेत. या संमेलनाचे अध्यक्ष आर. एस चोपड़े अहिल्या शिक्षण संस्था सांगलीचे अध्यक्ष असून प्रा. संजय सिंगाड़े हे स्वागताध्यक्ष आहेत.
दि.2 3 जुलै रोजी साहित्य दिंडीमध्ये 40 सांस्कृतिक रथ असतील. यातून जमातीचा इतिहास, धर्म, संस्कृति, साहित्य, रूढ़ि, परंपरा, चालीरीती, शैक्षणिक प्रबोधन रथ, सजीव देखावे, लेझिम, भजनी मंडळ, गाजेढोल, शोभा यात्रा द्वारे जनजागृती, प्रबोधनाचा संदेश प्रसारित करण्यात येईल, असे धनगर धर्मपीठाचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश कोळेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
करमाळा येथील पत्रकार परिषदेला धनगर साहित्य संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष डाॅ. अभिमन्यू टकले, करमाळा बाजार समितीचे सभापती प्रा.शिवाजीराव बंडगर, धनगर धर्म पिठाचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश कोळेकर, आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब टकले, रासप जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, तात्या काळे, शंकर सुळ रोडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.