Saturday, May 4, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडराष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे मोफत आरोग्य शिबिर संपन्न

राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे मोफत आरोग्य शिबिर संपन्न

पिंपरी चिंचवड : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी महापौर योगेश बहल यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या संकल्पनेतून आज पिंपरी येथील सावित्रीबाई फुले ग्रंथालय येथे नागरिकांसाठी मोफत कान नाक घसा व नेत्र तपासणी आरोग्य शिबिराचे आयोजित करण्यात आले. यावेळी २२० नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान शेख म्हणाले, “कष्टकरी, कामगार, अंग मेहनत करणारे नागरिक हे नेहमीच आपला आजारपण अंगावर काढत असतात काही नागरिक इच्छा असताना देखील डॉक्टरांची फी जास्त असल्यामुळे दवाखान्यात जात नाहीत त्यांच्या भावना समजून पक्षातर्फे हे मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले व इथून पुढे प्रत्येक रविवारी वेगवेगळ्या वार्डात प्रभागात अशा प्रकारचे आरोग्य शिबिरचे आयोजन होणार आहे.

या शिबिराचे उद्घाटन माजी महापौर योगेश बहल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्ष कविता आल्हाट, माजी शिक्षण मंडळाचे सभापती विजय लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक समीर मासुळकर, माजी नगरसेविका गीता मंचरकर, माजी नगरसेवक नारायण बहिरवडे, युवा नेते वीरेंद्र बहल, ज्ञानेश्वर कांबळे, राष्ट्रवादी ख्रिश्चन सेल महिला अध्यक्ष रेजिना फ्रान्सिस, अश्विनी कांबळे, रीमा रंजन, आयुष निंबारकर, शहर उपाध्यक्ष अमोल रावळकर, तुषार ताम्हणे, लवकुश यादव, दीपक गुप्ता, अनुज देशमुख, कुणाल कडू, ओम शिरसागर, मयुर खरात, समाधान अचलखांब, विजय शिंगाडे, प्रकाश गवई, निलेश लोंढे, धनराज चौधरी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर सचिव अमोल बेंद्रे यांनी केले.

संपादन – क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय