पिंपरी चिंचवड : आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने डीलक्स चौक, पिंपरी येथे भाजप सरकारच्या अघोषित आणीबाणी विरोधात निदर्शने आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्रातील सत्तेच्या सारीपाटावरती गेल्या दहा-बारा दिवसापासून ज्या घडामोडी घडत आहेत, त्यांचा मास्टरमाईंड भाजपाच आहे आणि सत्ता संघर्षाची ही राजकीय सर्कस ईडी, सीबीआय सारख्या संविधानिक संघटनांचा दुरुपयोग करून घडवून आणल्या हे आपल्या सर्वांसमोर स्पष्ट झाले आहे.
भ्रष्ट लोकांना पैशाने खरेदी करून सत्तेची गणिते जुळवण्याचे गलिच्छ राजकारण भाजपा संपूर्ण देशामध्ये करत आहे. ईडी मार्फत विरोधकांना नामोहरम करून समर्थन मिळाले कि क्लीन चिट देण्यात येत आहे. ही स्थिती भारतीय लोकशाही साठी घातक आहे. आज देशामध्ये भाजपच्या या गलिच्छ राजकारणाविरोधात फक्त आम आदमी पार्टीच सक्षमपणे लढा देत आहे, असे प्रतिपादन आपचे कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी केले.
या आंदोलनात स्वप्निल जेवळे, यल्लाप्पा वालदोर, चेतन बेंद्रे, प्रचार प्रमुख राज चाकणे, ब्रह्मानंद जाधव, यशवंत कांबळे, मंगेश आंबेकर, गोविंद माळी, आशुतोष शेळके, शुभम यादव, सुखदेव कारले, चंद्रमणी जावळे, संजय मोरे, संतोषी नायर, शशिकांत कांबळे, नितीन कापसे, नंदू नारंग, अजय सिंग, महेश गायकवाड, मीनाताई जावळे, सरफराज मुल्ला, विजय कांबळे, गणेश करडे, सोमनाथ बनसोडे आदीसह सहभागी झाले होते.
– क्रांतिकुमार कडुलकर