Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडवृक्षमित्र अरुण पवार व आशाताई पवार यांना 'वारकरी सेवा पुरस्कार' 

वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई पवार यांना ‘वारकरी सेवा पुरस्कार’ 

पिंपरी चिंचवड : संतांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर मोफत दिल्याबद्दल मराठवाडा जनविकास संघांचे अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई पवार यांना श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे “वारकरी सेवा पुरस्कार” देवून सन्मानित करण्यात आले.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई मंदिरात पालखीच्या मानाच्या अश्वाचे पूजन करतेवेळी हा सन्मान करण्यात आला.यावेळी श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरे समिती पंढरपूरचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती सार्वजनिक ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार, ह.भ.प. मारुती कोकाटे, राजाभाऊ थोरात, धनंजय बडदे, बाळासाहेब वांजळे आदी मान्यवरांच्या हस्ते वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई पवार यांना वारकरी सेवा पुरस्कार” देवून सन्मानित करण्यात आले.

अरुण पवार यांनी आळंदी घाट परिसर, मोरया गोसावी मंदिर परिसर व घाट, श्री क्षेत्र साई देवस्थान शिरगाव, श्री क्षेत्र देहू गाव व इंद्रायणी घाट परिसर, पिंपळे गुरव, सिंहगड किल्ला आदी ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

वंचितांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी वस्तीशाळा, आरोग्य शिबीरे, पिंपळे गुरव परिसरात डस्ट बिन वाटप, शालेय साहित्य वितरण ई. विविध स्तरावर अरुण पवार यांचे सामाजिक कार्य आहे.

– क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख

लोकप्रिय