Friday, November 22, 2024
Homeआंतरराष्ट्रीय8 मार्च जागतिक महिला दिना निमित्त....!

8 मार्च जागतिक महिला दिना निमित्त….!

       ” जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा…” पण या घाई घाईत ती कधी आई, कधी मुलगी, कधी सुंदर बहीण, निरागस खट्याळ खोडकर मैत्रिण, जिवपाड जपणारी प्रेयसी तर कधी एका घरात जन्म घेऊन दुसऱ्या घरात नंदनवन फुलंवणारी फुलराणी म्हणजे पत्नी, बायको, सौभाग्यवती आणि साथ जन्माची सोबती असा हा घाईचा प्रवास करतांना ती संस्कार, संस्कृती, आदर्श, विचार, संसार, कर्तव्य, जबाबदारी या सगळ्या भूमिका सहजतेने पार पाडणारी जगातील सर्वात मोठा “ महिमा ” असलेली प्रत्येक “ महिला ” मग तो महिमा ते महिला प्रवास कायम माता जिजाऊ पासून ते आजही माझ्या आयुष्यातील अनमोल नात्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असलेल्या सगळ्या महान महिमा असलेल्या प्रत्येक महिलेला फक्त शब्दातून शुभेच्छा नाही तर, तुमच्या प्रती जेव्हा जेव्हा माझ्यावर कुठलीही जबाबदारी येईल ती कर्तव्य म्हणून पूर्ण करेल ह्याच वचन पर शुभेच्छा. .!

महिला आणि महिमा यांची बेरीज केली की उत्तराला उभा असते “ ती ” कारण ती फक्त “ ती सध्या काय करते ? ” इथपर्यंत मर्यादित न राहता “ ती सध्या सगळ काही सुरळीत करते…! ” कारण “ नसतो संसार खेळ हा सारीपाट सोंगटयाचा..” हे जाणणारी ती खरी जाणकार असते.. कारण ती कायम माझ्यासारख्या प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यातील अविभाज्य जीव आहे म्हणून “ तुझ्यावाचून वांझ हा पुरुषार्थ हा..” हा पुरुषार्थ पूर्ण करणारी प्रत्येकाच्या आयुष्याला पूर्णार्थ देणारी तू मला कायम ती प्रत्येक महिला माझ्यासाठी सन्मान मूर्ती होती आहे आणि राहील…

तिच्या वेदनेचे, “ तिच्या सहनशीलतेचा, प्रयत्नांचे, यथा, यातना आणि वेदनांचे वेद वाचून कळत नाही त्यासाठी कायम तिच्यात आपलेपण जपून तिच्यासोबत कायम आपले समजून वागले तर नक्कीच ती आपल्याला समजते…” 

तिला शब्दातून शुभेच्छा न देता मनापासुन सन्मान, साथ, सोबत, विश्वास आणि पाठबळ द्या ती संसार, घर दार गल्ली ते दिल्ली आणि तुमच्या आमच्या व्याकुळ  आयुष्याचे  गोकुळ करू शकते कधी राधा, कधी मिरा, कधी रुख्मिणी तर कधी विठाई, कधी लक्ष्मी, कधी देवकी, कधी यशोदा, कधी द्रौपदी कधी गांधारी, कधी सीता, गीता आणि गाथा होते म्हणूनच तिला शुभेच्छा फक्त शब्दातून न देता मी माझ्या आयुष्यात असलेल्या प्रत्येक हक्काच्या महिलेला आणि भविष्यात अलवार पणे येणाऱ्या ती ला तीच अस्तित्व, स्वतंत्र आणि अभिव्यक्ती विचाराने कायम साथ सोबत देणे कर्तव्य मानून पूर्ण करेल… 

महिला दिनाच्या निमित्त दोन ओळी उसण्या घेईल…

पुण्य ही माझे विधात्या हवे तर पाप कर

पण मला एक मुलीचा बाप कर…!

आणि शेवटी इतकंच ह्या महिला दिवसा निमित्त…

संसार फाटका असेल तरी चालेल विठ्ठला

फक्त गाथेचा पदर दे माझ्या पोरीच्या माथ्याला…

 विशाल आडे….

संबंधित लेख

लोकप्रिय