Thursday, July 18, 2024
HomeNewsझुंड चित्रपटावर बंदी करणाऱ्या याचिकाकर्त्याला ठाठावला १० लाखांचा दंड

झुंड चित्रपटावर बंदी करणाऱ्या याचिकाकर्त्याला ठाठावला १० लाखांचा दंड

मुंबई : नागराज मंजुळे यांच्या सैराटच्या तुफान यशानंतरचा मंजुळे दिग्दर्शित झुंड सिनेमाची सगळीकडे सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अभिनेता अमिताभ बच्चन आणि या सिनेमाच्या कथे विषयी सर्वत्र बोललं जातंय. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना निवृत्त फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे भेटतात आणि त्यांचं आयुष्य बदलून टाकतात, अशी या चित्रपटाची कथा आहे. या सिनेमाचं तोंड भरून कौतुक केलं जातयं, मात्र अशात झुंड चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली जातेय.

एका क्रिडा शिक्षक आणि झोपडपट्टीतील विद्यार्थी यांच्यावरील हा “झुंड सिनेमा स्थगित करा”, अशी मागणी करणारी याचिका हैद्राबादमधले चित्रपट निर्माते नंदी चिन्नी कुमार यांच्याकडून न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यात त्यांनी सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली.

या प्रकरणाची सुनावणी करताना तेलंगणा उच्च न्यायालयाने याचिकाकर्ते नंदी चिन्नी कुमार यांना 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. एका महिन्याच्या आत पंतप्रधानांच्या कोविड-19 रिलीफ फंडात भरण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. ही रक्कम वेळेत न भरल्यास जिल्हाधिकार्‍यांनी महसूल वसुली कायद्यांतर्गत ती वसूल करून ती पीएम फंडात पाठवावी, असे आदेशही न्यायालयानं दिले आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय