नवी दिल्ली : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) पहिल्या महिला बटालियनला( CISF Women Battalion ) विमान तळ, मेट्रो रेल्वेची सुरक्षा जबाबदारी देण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केला आहे. (CISF Women Battalion)
५३ व्या सीआयएसएफ दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निर्देशानुसार दलात महिला तयार करण्याच्या प्रस्तावावर काम सुरू करण्यात आले होते.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी सांगितले की, सरकारने केंद्रीय सीआयएसएफच्या पहिल्या महिला बटालियनच्या स्थापनेला मान्यता दिली आहे.
आपल्या एक्स पोस्टमध्ये ते म्हणाले, राष्ट्र उभारणीच्या प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने ठोस पावले उचलत मोदी सरकारने सीआयएसएफची पहिली महिला बटालियन स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. (CISF Women Battalion)
देशातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा, जसे की विमानतळ आणि मेट्रो रेल्वे सुरक्षित करण्याची आणि कमांडोजच्या रूपात व्हिआयपी सुरक्षा प्रदान करण्याची जबाबदारी घेईल. या निर्णयामुळे अधिकाधिक महिलांच्या राष्ट्ररक्षणाच्या महत्त्वाच्या कार्यात सहभागी होण्याची आकांक्षा पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
विमानतळासह इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा दलांची झपाट्याने वाढणारी तैनाती लक्षात घेऊन केंद्र सरकारने पहिल्या महिला CISF राखीव बटालियनला मान्यता दिली आहे. यामध्ये 1050 अधिक महिला कर्मचारी भरती केले जाणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्रालयाने याच आठवड्यात आपला आदेश जारी केला आहे. वरिष्ठ कमांडंट दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली महिला कॉन्स्टेबल या बटालियनमध्ये असतील.
सध्या सीआयएसएफ मध्ये एकूण 7 टक्के महिला आहेत. त्याचे प्रमाण वाढवण्यात येत आहे.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अर्थात् सीआयएसएफकडे सध्या १२ राखीव बटालियन आहेत. सरकार लवकरच सी आय एस एफ मध्ये महिलांची भरती तातडीने सुरू करून देशातील विमानतळ, मेट्रो स्टेशन्स आदी महत्वाच्या ठिकाणी महिला बटालियन कडे सुरक्षेची जबाबदारी देणार आहे.
हेही वाचा :
चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांना यश ; बाणेर-बालेवाडी पाणी प्रश्न मार्गी
लग्नसराईत सोनं झालं स्वस्त ; खरेदीसाठी ग्राहकांची लगबग वाढली
भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
भरधाव क्रुझर पुलाच्या कठड्याला धडकली, चालकाचा मृत्यू ; ७ जखमी
माजी मंत्री नितीन राऊत यांच्या कारला भीषण अपघात
अजितदादांसाठी अभिनेत्री प्रचाराच्या मैदानात ; व्हिडिओ शेअर करत मतदानाचं आवाहन
सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना थेट इशारा, म्हणाल्या…
नारायण राणेंच्या पत्नीने मुलांच्या व नवऱ्याच्या स्वभावाबद्दल व्यक्त केली खंत
मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य