Tuesday, December 3, 2024
Homeताज्या बातम्याAJIT GAVHANE : सिरवी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणार -अजित गव्हाणे

AJIT GAVHANE : सिरवी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणार -अजित गव्हाणे

सिरवी समाजाचा गव्हाणे यांना पाठिंबा; 20 नोव्हेंबर रोजी मतदानाचे आवाहन (AJIT GAVHANE)

अजित गव्हाणे संधीचे सोने करतील- हनुमंत भोसले



पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – पिंपरी-चिंचवड शहरात विखुरलेल्या समस्त सिरवी समाजाच्या सुख-दुःखामध्ये सदैव साथ देणाऱ्या अजित गव्हाणे यांच्या पाठीशी समाज खंबीरपणे उभा आहे असे सिरवी समाजाच्या वतीने जाहीर करण्यात आले. या पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त करतानाच सिरवी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे अजित गव्हाणे यांनी सांगितले. (AJIT GAVHANE)

नेहरूनगर येथे माजी विरोधी पक्ष नेते राहुल भोसले यांच्या जनसंपर्क कार्यालयात रविवारी (दि.10) बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सिरवी समाजाच्या वतीने महाविकास आघाडी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाचे भोसरी विधानसभेचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. यावेळी माजी महापौर हनुमंत भोसले, विरोधी पक्ष नेते राहुल भोसले, माजी नगरसेवक समीर मासुळकर, सिरवी समाजाचे अध्यक्ष वाघाराम केशवजी चौधरी, उपाध्यक्ष बाबुलाव पन्नाजी चौधरी, सचिव गणेशराम लाधाजी चौधरी, रमेश रामजी चौधरी, युवा सचिव मोहनलाल धोघारामजी चौधरी, महिलाध्यक्ष संतोष भेराराम चौधरी आदी उपस्थित होते. (AJIT GAVHANE)


यावेळी अजित गव्हाणे यांनी सिरवी समाजाचे पाठिंबा दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. अजित गव्हाणे म्हणाले नेहरूनगर भागामध्ये सिरवी समाजाचे काम चांगले आहे. या भागात हा समाज गुण्यागोविंदाने, शांततेने नांदत आहे. व्यवसायाच्या निमित्ताने हा समाज शहरभर विखुरलेला आहे. छोटे मोठे व्यवसाय करणारा हा समाज शहराच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचे योगदान देत आहे. गेल्या काही वर्षापासून हा समाज आपल्या शहरात मिसळून गेला आहे.

आगामी काळात या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार दिला जाईल असे देखील अजित गव्हाणे यावेळी म्हणाले.

अजित गव्हाणे संधीचे सोने करतील – भोसले

अजित गव्हाणे यांचे वडील कै.दामोदर गव्हाणे यांच्याशी माझा जवळून परिचय होता. त्यांच्याशी मैत्रीपूर्ण आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांनी समाजकारण ,राजकारण अतिशय नीतिमत्तेने केले. त्यांच्याच आदर्शावर पाऊल ठेवत अजित गव्हाणे गेल्या 25 वर्षापासून राजकारणात कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्याला उत्तम नेता लाभणार आहे. त्यांना संधी द्या, मी विश्वास देतो अजित गव्हाणे संधीचे सोने करतील असे माजी महापौर हनुमंत भोसले म्हणाले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

छगन भुजबळांना मुख्यमंत्री न करण्यामागचं शरद पवारांचं धक्कादायक स्पष्टीकरण

धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल; लाडकी बहिण योजनेवर वादग्रस्त वक्तव्य

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या हस्ते भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन जाहीर

नताशा स्टँकोविक हिचा हार्दिक पांड्यासोबतच्या नात्याविषयी नवा खुलासा

शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून अश्लील व्हिडीओ शूट

गुन्हेगारी संपवू ,बेरोजगारी संपवू, विकासाचे सर्व प्रश्न हाताळू – रोहित पवार

मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य

धक्कादायक : सांगलीत कुऱ्हाडीने वार करून भाजप नेत्याची निर्घृण हत्या

अकोल्यातील सभेत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; गरिबांना पक्के घर देणार

महायुतीचे सरकार येताच पहिले काम ‘हे’ करणार? नरेंद्र मोदींची घोषणा

फॉर्म भरुनही पैसे आले नाही ; महत्वाची माहिती समोर

संबंधित लेख

लोकप्रिय