Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडAlandi : आळंदीत संत जलारामबाप्पा यांची जयंती उत्साहात साजरी

Alandi : आळंदीत संत जलारामबाप्पा यांची जयंती उत्साहात साजरी

आळंदी / अर्जुन मेदनकर : गुजरातचे संत श्री जलाराम बाप्पा यांची २२५ वी जयंती विविध सामाजिक, धार्मिक उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. (Alandi)

या प्रसंगी जलाराम सत्संग मंडळाचे अध्यक्ष धीरूभाई राजा, विश्वस्त राजूभाई मदलानी, दिनेशभाई वरु, भरतभाई पटेल, नारायणभाई सोळंकी, नरेंद्रभाई चोटाई, चिराग राजा यांचेसह राज्यातून आलेल्या जलाराम बाप्पांचे भक्तमंडळी मोठ्या संख्येने आळंदीत उपस्थित होती.

जयंतीच्या निमित्ताने श्री जलाराम बाप्पांच्या प्रतिमेची तसेच जलाराम सत्संग मंडळाचे भूतपूर्व अध्यक्ष स्व. मगनभाई राजा यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक, बँड बाजाच्या तालासुरात भक्त मंडळींच्या गरबा नृत्याच्या माध्यमातून आळंदीतून झाली.


मिरवणुकीत ठिकठिकाणी जलाराम बाप्पांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून तसेच सत्संग मंडळाचे पदाधिकारी यांचा सत्कार, स्वागत करण्यात आले. यात आळंदी पोलीस स्टेशन, माजी नगराध्यक्ष सुरेश वडगावकर, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, माजी उपनगराध्यक्ष रामदास भोसले, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, उद्योजक अनिल वडगावकर, सामाजिक कार्यकर्ते विलास वाघमारे, विजय लोखंडे, आळंदी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदकुमार वडगावकर, पोपटशेठ वडगावकर, माजी नगरसेवक मदनलाल बोरुंदिया, संतोष चोरडिया, राजूशेठ चोपडा, गणपतराव कुऱ्हाडे आदींचे उपस्थितीत स्वागत करण्यात आले. (Alandi)

जलाराम सत्संग मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस तसेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

या प्रसंगी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, राजाभाऊ चौधरी आदी उपस्थित होते. आळंदी पोलीस स्टेशनच्या वतीने मिरवणुकीचे मार्गावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जयंती दिनी रक्तदान शिबिराचे उत्साहात आयोजन करण्यात आले.

यात जलाराम भक्तांनी मोठा प्रतिसाद देत रक्तदान केले. महाप्रसाद वाटपाने सांगता झाली.

संबंधित लेख

लोकप्रिय