Saturday, December 7, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडAjit Pawar : निवडणूक हलक्यात घेऊ नका, सजग राहा - उपमुख्यमंत्री अजित...

Ajit Pawar : निवडणूक हलक्यात घेऊ नका, सजग राहा – उपमुख्यमंत्री अजित पवार

आमदार अण्णा बनसोडे यांना विजयी करण्याचे आवाहन (Ajit Pawar)

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – ही विधानसभा निवडणूक हलक्यात घेऊ नका. कोणीही गाफील राहू नका. १९९९ साली तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार २७० विरुद्ध २६९ असे एका खासदारामुळे पडले होते. आपल्याला प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. त्यामुळे कोणीही गाफील राहू नका असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना केले. (Ajit Pawar)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सर्वाधिक फायदा पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महिलांना झाला आहे. आ. अण्णा बनसोडे यांनी यासाठी चांगले काम केले.

करोना काळात शहरातील नागरिकांचे लसीकरण होण्यासाठी बनसोडे यांनी २५ लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांना दिला. तसेच इतर आरोग्यविषयक सुविधांसाठी सव्वा कोटींचा निधी दिला. बनसोडे हे सामाजिक भान जपणारे नेते आहेत, म्हणूनच त्यांना तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.

काळभोरनगर, आकुर्डी येथे महायुतीचा मेळावा पार पडला. मेळाव्यात अजित पवार बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, उमा खापरे,आरपीआयच्या महिला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांता सोनकांबळे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी महापौर व समन्वयक योगेश बहल, माजी उपमहापौर तुषार हिंगे, प्रभाकर वाघेरे, आतिश बारणे, आरपीआय चे नेते बाळासाहेब भागवत व शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, महाराष्ट्र शासन अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे, ज्ञानेश्वर कांबळे, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, राष्ट्रवादी शहर कार्याध्यक्ष फजल शेख, शाम लांडे, भाजपा शहर कार्याध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी नगरसेवक राजेश पिल्ले, संदीप वाघेरे, नारायण बहिरवाडे, वैशाली काळभोर, राजू दुर्गे, उल्हास शेट्टी, माई काटे, संजय काटे, सुजाता पालांडे, काळूराम पवार, जितेंद्र ननवरे नारायण बहिरवाडे, सतीश दरेकर, राजेश वाबळे, सरिता साने, युवा नेते निलेश डोके, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष विजय लोखंडे, राष्ट्रवादी युवती शहराध्यक्ष वर्षा जगताप, सामाजिक न्याय महिला अध्यक्ष गंगा धेंडे, असंघटित कामगार नेते रवींद्र ओव्हाळ, युवा नेते अनुप मोरे, कष्टकरी कामगारांचे नेते बाबा कांबळे, सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष संजय अवसरमल, शेखर काटे, मायला खत्री, अक्षय माछरे, तुषार ताम्हाणे, हाजीभाई शेख, कविता खराडे, राजू लोखंडे, चंदा लोखंडे, प्रकाश सोमवंशी, बाळासाहेब वाल्हेकर, निलेश तरस, शैला पाचपुते, पल्लवी पांढरे, आशा शिंदे, सुनीता अडसूळ, मनीषा गटकळ, युसुफ कुरेशी, अकबर मुल्ला, प्रदीप आवटे, विनोद वरखडे, आदी उपस्थित होते. (Ajit Pawar)

अजित पवार म्हणाले, अण्णा बनसोडे हे सर्वसामान्य कार्यकर्ते होते. त्यांचा संपर्क चांगला आहे. त्यांना त्यांचे काम करू द्या. बनसोडे आणि महायुती यांच्यामध्ये समन्वय राखण्याचे काम योगेश बहल, सदाशिव खाडे हे करतील. पुढील काळात विरोधक चुकीच्या गोष्टी पसरवतील अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पवार यांनी केले.

पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे उद्योग नगरीसह या शहराची मिनी भारत म्हणून ओळख झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरावर माझे प्रेम आहे.

लक्ष्मण जगताप तसेच महेश लांडगे हे देखील माझेच कार्यकर्ते आहेत, असे म्हणत उपमुख्यमंत्री पवार यांनी दिवंगत नेते लक्ष्मण जगताप यांच्या आठवणींना उजाळा दिला. या निवडणुकीतील माघार घेतलेल्या उमेदवारांचेही त्यांनी आभार मानले.

विरोधकांवर टीका करताना अजित पवार म्हणाले, विरोधकांकडून पंचसूत्रीच्या नावाखाली मोठमोठ्या घोषणा केल्या. महिलांना तीन हजार रुपये देणार असल्याचे विरोधकांकडून सांगण्यात आले. आम्ही दीड हजार रुपये देत असताना राज्याची तिजोरी खाली झाल्याचा आरोप करण्यात आला. मग आता हे तीन हजार रुपये कुठून आणणार हा प्रश्न आहे. आम्ही अशा योजना राबविताना आर्थिक नियोजन केले आहे.

राज्यातील ग्राहकांना एक युनिट वीज पुरविण्यासाठी सात रुपये खर्च येतो. मात्र सोलर द्वारे निर्मित झालेल्या विजेचा पुरवठा करण्यासाठी साडेतीन रुपये खर्च येतो. शिल्लक राहिलेले पैसे शेतकऱ्यांसाठी देणार त्याचे आर्थिक नियोजन केले आहे. विरोधक लोकांना फसविण्याचे काम करत आहेत. हा त्यांचा चुनावी जुमला आहे असे पवार म्हणाले.

भारतातील एकूण विदेशी गुंतवणुकीत आपण प्रथम असून ५२ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय मोठे प्रकल्प राज्यात गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करत आहेत. महाराष्ट्र परदेशी गुंतवणूकीत सर्वात पुढे आहे. क्रमांक एकवर आहे.

महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या एकूण जागांपैकी दहा टक्के जागा मुस्लिम, बारा टक्के जागा अनुसूचित जाती, बारा टक्के जागा अनुसूचित जमाती आणि दहा टक्के जागा महिलांना दिल्या आहेत. एकूण ४४ टक्के जागा सर्व समाज घटकांना दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांचा पुरोगामी विचार पुढे घेऊन जात पुरोगामी महाराष्ट्र घडविण्याचा आपला प्रयत्न असल्याचे पवार म्हणाले.

पिंपरी चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन टाटा धरणातून पाणी आणावे लागेल. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रिंग रोड बनवला जात आहे. पीएमपीएमएल सक्षम केली जात आहे. मेट्रोचे जाळे वाढवले जाते आहे. शहरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आणखी जास्त राबवावे लागतील.

पिंपरी मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागील जागेवर रमाई स्मारक होणार आहे. हे स्मारक नावाला साजेसे होणार आहे. पिंपरी चिंचवड शहराचा विकासाचा वेग आणखी वाढवण्यासाठी आण्णा बनसोडे यांना विजयी करा असे आवाहन अजित पवार यांनी केले.

संबंधित लेख

लोकप्रिय