Vidhan Sabha Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार रंगताना काँग्रेस खासदार राहुल गांधी आज, 6 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. नागपूर आणि मुंबईतील सभा घेत, राहुल गांधी महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ फोडणार असून, या वेळी ते पाच महत्त्वाच्या घोषणांची गॅरंटी देणार आहेत, ज्यामुळे निवडणुकीचे गणित बदलू शकते.
राहुल गांधी आज नागपुरातील ‘संविधान सन्मान संमेलन’ कार्यक्रमात सहभागी होणार असून, संध्याकाळी मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील ‘महाराष्ट्र स्वाभिमान सभा’त त्यांनी या पाच प्रमुख गॅरंटी जाहीर करणार आहेत.
राहुल गांधींच्या पाच गेमचेंजर घोषणा :
- 15 लाख रुपयांपर्यंत विमा कवच : महाराष्ट्रातील नागरिकांना आर्थिक आधार मिळावा यासाठी 15 लाख रुपयांपर्यंत विमा कवच दिले जाणार आहे.
- महिलांसाठी 3000 रुपये : महिलांसाठी विशेष योजना जाहीर करत, त्यांना प्रतिमाह 3000 रुपये देण्याची शक्यता आहे.
3 . महिलांना एसटीचा मोफत प्रवास :महिलांना एसटी बसचा मोफत प्रवास देण्यात येणार असून, त्यासाठी विशेष योजना राबवली जाईल.
- शेतकऱ्यांची कर्जमाफी : 3 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे, यामुळे शेती क्षेत्राला मोठा दिलासा मिळेल.
- नोकरभरती आणि जातिनिहाय जणगणना : नियमित नोकरभरतीसाठी कॅलेंडर प्रमाणे नियोजन आणि जातिनिहाय जणगणना करण्याचे आश्वासन दिले जाईल.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या जाहीरनाम्यातील 10 महत्त्वाच्या घोषणा कोल्हापुरातील सभेत जाहीर केल्या. त्यात महिलांसाठी 2100 रुपये, शेतकऱ्यांसाठी 15 हजार रुपयांची मदत, प्रत्येकासाठी अन्न व निवारा हमी, वृद्धांसाठी 2100 रुपयांची पेन्शन मदत, राज्यातील तरुणांना 25 लाख रोजगार, अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांना 15 हजार वेतन, तसेच 30% वीज बिल कपात, शंभर दिवसात व्हिजन महाराष्ट्र 2029 सादर करणार.यांचा समावेश आहे.
राहुल गांधींच्या या घोषणांमुळे महाविकास आघाडीला महाराष्ट्रात नवा राजकीय नरेटिव्ह मिळण्याची शक्यता आहे.महाविकास आघाडी व महायुती यांच्यातील या स्पर्धात्मक घोषणांनी महाराष्ट्रातील निवडणुकीचा रंग अधिकच वाढवला असून, या मुद्द्यांवर निवडणुकीचा नरेटिव्ह सेट होईल, अशी शक्यता आहे.
Vidhan Sabha Election
हेही वाचा :
मुख्यमंत्री शिंदेंच्या दहा मोठ्या घोषणा; राज्यातील बहिणींना मिळणार 2100 रुपये दरमहा
उद्धव ठाकरेंनी निवडणुकीपूर्वी दिली पाच मोठी आश्वासने
दिवाळीनंतर सोनं झालं स्वस्त ; ग्राहकांसाठी आनंदाची बातमी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर
रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालक पदावरून बदली; महाविकास आघाडीला मोठे यश
दिवाळीच्या फराळातून मतदारांना पैसे वाटप ; सांगलीत शरद पवार गटाचे उमेदवार अडचणीत
मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार
लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर