Sunday, December 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडBhosari Vidhan sabha 2024 : कामाच्या बळावर महेश लांडगे यांचा विजय निश्चित...

Bhosari Vidhan sabha 2024 : कामाच्या बळावर महेश लांडगे यांचा विजय निश्चित – उत्तम केंदळे

यमुनानगर निगडीतील नागरिकांची कामे मार्गी लावल्याचे प्रतिपादन (Bhosari Vidhan sabha 2024)

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – आमदार महेश लांडगे हे कामाच्या बळावर मागील दहा वर्षात घराघरात पोहोचले आहेत. केलेल्या विकास कामांच्या बळावर ते तिसऱ्यांदा आमदार होतील एवढेच नव्हे तर महायुती सरकार मध्ये ते मंत्री झालेले दिसतील असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क्रीडा समितीचे माजी सभापती उत्तम केंदळे यांनी माध्यमांशी बोलताना केले. (Bhosari Vidhan sabha 2024)

आमदार लांडगे यांनी विविध विकास कामे केली आहेत. यमुना नगर प्रभाग क्रमांक १३ मधील अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. शास्ती कराचा प्रश्न त्यांनी मार्गी लावल्याने अडीच हजार मालमत्तांना त्याचा लाभ होणार आहे. प्राधिकरणाची घरे फ्री होल्ड करण्याचा विषय त्यांनी मार्गी लावला. त्याचाही फायदा मोठ्या प्रमाणात विशेषता सेक्टर नंबर २१, २२ मधील नागरिकांना होणार आहे.

निगडीतील भक्ती शक्ती उड्डाणपुलाचे भूमिपूजन भाजपच्याच कार्यकाळात झाले आणि ते पूर्णत्वासही गेले. निगडी गावठाणा मधील शाळा आणि बाजारपेठ जोडणारा निगडी गावठाण भुयारी मार्गाच्या कामासाठी निधी देऊन आमदार महेश दादा लांडगे यांनी हे काम पूर्णत्वास नेले. टिळक चौक ते दुर्गा नगर चौक तेथून त्रिवेणी नगर चौक या भागात अर्बन स्टेट डेव्हलपमेंटच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला.

पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता असताना संतोष लोंढे व नितीन लांडगे यांच्या स्थायी समिती सभापती पदाच्या कार्यकाळात निगडी स्मशानभूमीसाठी साडेचार कोटी रुपयांचा निधी आमदार महेशदादा लांडगे यांनी उपलब्ध करून दिला. निगडी स्मशानभूमी मध्ये सीमाभिंत, विद्युत व गॅस दाहिनी सुविधा त्यामुळे उपलब्ध झाली असे केंदळे यांनी सांगितले. (Bhosari Vidhan sabha 2024)

शहरातील दुसरा लाईट हाऊस प्रकल्प यमुना नगरला उभारण्यात आमदार महेश दादा लांडगे यांनी पुढाकार घेतला. दीड वर्षात या ठिकाणी ७०० तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. आमदार लांडगे यांनी सेक्टर नंबर २२ मधील समाज मंदिरे व बुद्ध विहारांचे नूतनीकरण व सुशोभीकरण करण्यासाठी आमदार निधीतून मोठी मदत दिली.

यमुनानगर येथील २५ पेक्षा जास्त सोसायटीमध्ये पेविंग ब्लॉक बसविले. विविध कामांच्या माध्यमातून आमदार लांडगे हे घराघरात पोहोचले असल्याने ते तिसऱ्यांदा विक्रमी मतांनी विजयी होतील व महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री होतील असा विश्वास केंदळे यांनी व्यक्त केला.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

तुमचे पूर्वज मुघलांची चाकरी करायचे ; संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्ला

राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर ; महाविकास आघाडीच्या ‘पाच गॅरंटी’ जाहीर करणार

मुख्यमंत्री शिंदेंच्या दहा मोठ्या घोषणा; राज्यातील बहिणींना मिळणार 2100 रुपये दरमहा

उद्धव ठाकरेंनी निवडणुकीपूर्वी दिली पाच मोठी आश्वासने

दिवाळीनंतर सोनं झालं स्वस्त ; ग्राहकांसाठी आनंदाची बातमी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर

मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवर भोजपुरी गाण्यावर बाई नाचते;राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर हल्लाबोल

रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालक पदावरून बदली; महाविकास आघाडीला मोठे यश

दिवाळीच्या फराळातून मतदारांना पैसे वाटप ; सांगलीत शरद पवार गटाचे उमेदवार अडचणीत

मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार

लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर

संबंधित लेख

लोकप्रिय