Weather News : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असून, महाराष्ट्रात हवामानामध्ये बदल दिसून येत आहे. आज राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. विशेषत: कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात पुढील 24 तासांमध्ये वादळी वारे आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण विभागात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर दक्षिण महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने या भागांमध्ये ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे.
याशिवाय, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाटमाथ्यावर तापमान घटण्याची शक्यता असून वातावरणात थंडी जाणवण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र मुंबईत उन्हाचा कडाका अधिक जाणवणार आहे.
आज ‘दाना’ चक्रीवादळ ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागांवर धडकण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाचा परिणाम मुख्यत्वे या भागांवर दिसून येईल. याशिवाय आज रात्रीपर्यंत हे चक्रीवादळ रौद्र रूप धारण करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.महाराष्ट्रावर या चक्रीवादळाचा मोठा परिणाम होणार नाही, मात्र हवामान खात्याने समुद्रकिनारी असलेल्या लोकांना ,मच्छीमारांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये 24 आणि 25 ऑक्टोबर रोजी या चक्रीवादळाचा लँडफॉल होण्याची शक्यता आहे.
यामुळे हवामान खात्याने किनारपट्टी भागात समुद्रात मोठ्या लाटा उसळण्याचा इशारा दिला असून, नौकांना समुद्रात उतरण्यापासून सावध राहण्याची सूचना करण्यात आली आहे.
Weather News
हेही वाचा :
मनसेची दुसरी उमेदवारी यादी जाहीर; राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात
शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर; मुख्यमंत्री शिंदेंसह अनेक उमेदवारांची नावे घोषित
लॉरेन्स बिश्नोई महाराष्ट्रातून विधानसभा निवडणूक लढवणार? ‘या’ पक्षाकडून मिळाली ऑफर
सूरज चव्हाणचा पहिलाच सिनेमा वादाच्या भोवऱ्यात, कोर्टात जाण्याची शक्यता!
सलमान खानला मारण्याचा कट उघड ;धक्कादायक माहिती समोर
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, दहावीच्या परीक्षेत मोठा बदल
पुण्यात बड्या नेत्याच्या कारमधून 5 कोटींचं घबाड जप्त
पुण्यातील महात्मा फुले मंडई परिसरातील मेट्रो स्थानकाला भीषण आग
भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर – 99 जागांसाठी उमेदवारांची नावे घोषित
देशभरात ‘इमर्जन्सी’ लागणार, महत्वाची माहिती समोर
नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सर्वात मोठा बदल
पुण्यात बड्या व्यावसायिकांच्या घरावर ईडीचा छापा; 85 कोटींची मालमत्ता जप्त
हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत भरती
ONGC Bharti : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध जागांसाठी भरती